फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर किती? सरकारसह सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात महागाई दरात (inflation rate) कोणत्याही प्रकारची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याप्रमाणेच फेब्रुवारीमध्ये देखील स्थिती राहीली आहे.
Inflation Rate : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात महागाई दरात (inflation rate) कोणत्याही प्रकारची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याप्रमाणेच फेब्रुवारीमध्ये देखील स्थिती राहीली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर (retail inflation rate) 5.09 टक्के होता. ह दर जानेवारी महिन्याइतकेच आहे.
फेब्रुवारी महिन्यात देशात किरकोळ महागाईत कोणतीही वाढ झालेली नाही. देशातील महागाईचे आकडे जानेवारी महिन्याप्रमाणेच दिसून आले. हा सरकारसह सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.5 टक्के होता. याचा अर्थ गेल्या एका वर्षात किरकोळ चलनवाढीच्या आकड्यांमध्ये सुमारे 150 आधार अंकांची घट झाली आहे.
एप्रिलपूर्वी महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत खाली येणार का?
फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.09 टक्के होता. सीपीआय आधारित चलनवाढ जानेवारीमध्ये 5.1 टक्के आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44 टक्के होती. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात देशातील किरकोळ महागाईच्या आकडेवारीत 1 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मार्च महिन्यातच किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या खाली येऊ शकतो. एप्रिलपूर्वी महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत खाली यावा अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचा ईएमआय कमी करता येईल. दरम्यान, असे झाल्यास आरबीआय ईएमआयमध्ये 0.25 टक्के कपात करू शकते. यूएस फेड येत्या दोन ते तीन महिन्यात व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात करू शकते.
खाद्यपदार्थांच्या महागाईत किंचित वाढ
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईत किंचित वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा आकडा 8.66 टक्के होता, जो मागील महिन्यातील 8.3 टक्क्यांपेक्षा किरकोळ जास्त आहे. किरकोळ महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे. गेल्या महिन्यात चलनविषयक धोरणाच्या बैठकीत मध्यवर्ती बँकेने 2023-24 मध्ये महागाई 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या:
महागाईपासून जनतेला मोठा दिलासा, महागाई दरात घसरण; सध्या महागाई दर किती?