अर्थसंकल्पापूर्वीच मुकेश अंबानींना मोठा झटका, 5 दिवसात 75 हजार कोटींचा फटका, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं नुकसान
अर्थसंकल्पाच्या जवळपास आठवडाभरापूर्वीच देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.सुमारे 75 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
Mukesh Ambani : अर्थसंकल्पाच्या जवळपास आठवडाभरापूर्वीच देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमधून सुमारे 75 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, एलआयसी आणि एसबीआयच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची कर्जदार ICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्येही घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात देशातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 1,25,397.45 कोटी रुपयांनी घसरले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं नुकसान झालं आहे.
दुसरीकडे, देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले आहे. या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकत्रितपणे 58,554.88 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. TCS, HDFC बँक, Airtel, IT आणि HUL च्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 428.87 अंक किंवा 0.55 टक्क्यांनी घसरला आणि निफ्टी 111 अंकांनी किंवा 0.47 टक्क्यांनी घसरला.
देशातील 'या' कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 74,969.35 कोटी रुपयांनी घसरून 16,85,998.34 कोटी रुपयांवर आले.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LICI) चे मूल्यांकन 21,251.99 कोटी रुपयांनी घसरून 5,19,472.06 कोटी रुपयांवर आले आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन तो 17,626.13 कोटी रुपयांनी कमी होऊन 6,64,304.09 कोटी रुपयांवर आला.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी ICICI बँकेचे मूल्यांकन 11,549.98 कोटी रुपयांनी घसरून 8,53,945.19 कोटी रुपयांवर आले आहे.
'या' कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे बाजार भांडवल 24,934.38 कोटी रुपयांनी वाढून 7,78,612.76 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
देशातील सर्वात मोठ्या खाजगी कर्जदार एचडीएफसी बँकेने 9,828.08 कोटी रुपयांची भर घातली आणि त्याचे मूल्यांकन 12,61,627.89 कोटी रुपये झाले.
देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे बाजारमूल्य 9,398.89 कोटी रुपयांनी वाढून 9,36,413.86 कोटी रुपये झाले आहे आणि
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्यांकन 9,262.3 कोटी रुपयांनी वाढून 15,01,976.67 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरचा एमकॅप 3,442.15 कोटी रुपयांनी वाढून 5,56,594.67 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या ITC चे मूल्यांकन 1,689.08 कोटी रुपयांनी वाढून 5,52,392.01 कोटी रुपये झाले आहे.