एक्स्प्लोर

LPG Price Today : नवीन वर्षाची भेट! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घट, किती स्वस्त झाले दर?

LPG Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट केली आहे. यामुळे नवीन वर्षात दिलासा मिळाला आहे.

LPG Gas Cylinder Price Today : नवीन वर्षात (Happy New Year 2024) सर्वसामान्यांना मोठी भेट मिळाली आहे. आज एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Cylinder) स्वस्त झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले आहेत. आज 1 जानेवारी 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. महिन्याभरात गॅस सिलेंडरचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहेत.

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त

आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारीन तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करत मोठी भेट दिली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. दरम्यान, आज गॅस सिलेंडरच्या दरात केलेली कपात सामान्य आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एक ते दीड रुपयांनी कमी झाले आहे. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर कायम आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरांमध्ये LPG च्या नवीन किंमती

आज व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात केल्यानंतर आज दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. याआधी हा दर 1,757 रुपये होता, त्यामुळे दिल्लीत दर दीड रुपयांनी कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये एलपीजीच्या किंमतीत सर्वाधिक 4.50 रुपयांची कपात करण्यात आली असून 19 किलोचा सिलेंडर आता 1,924.50 रुपयांना मिळेल. मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 50 पैशांनी वाढली असून आज दर 1,869 रुपये आहे.

एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात

भारतीय तेल कंपन्यांनी याआधी 22 डिसेंबरलाही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. त्यानंतर 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी झाली. त्याआधी 1 डिसेंबरलाही व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले होते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पंधरवड्याने आढावा घेतात.

घरगुती एलपीजी सिलेंडरचा भाव काय?

आज 1 जानेवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला असला, तरी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला होता, त्यानंतर सिलेंडरचे दर कायम आहेत. आज मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 902.50 रुपये तर, दिल्लीमध्ये 903 रुपये आहे. त्यासोबतच चेन्नईमध्ये 918.50 आणि कोलकातामध्ये 929 रुपये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rule Changes from 1st January 2024 : नवीन वर्षात खिशाला कात्री! UPI, ITR सह अनेक आर्थिक नियमांत बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget