एक्स्प्लोर

Rule Changes from 1st January 2024 : नवीन वर्षात खिशाला कात्री! UPI, ITR सह अनेक आर्थिक नियमांत बदल

Financial Rule Change from 1st January 2024 : नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे.

Rule Changes from 1st January 2024 : आज नववर्षाच्या (Happy New Year 2024) पहिल्या दिवसापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम (Financial Rule Change) बदलले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे. 1 जानेवारी 2024 पासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.

सिमकार्ड

आजपासून नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यामुळे मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणं अनिवार्य केलं आहे. 

निष्क्रिय UPI अकाऊंट बंद होणार

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून यूपीआय अकाऊंट (UPI Account) संदर्भातील नियमातही बदल झाला आहे. गेल्या एक वर्षापासून वापरात नसलेली UPI खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून आजपासून बंद करण्यात येणार आहे.

आयकर परतावा

1 जानेवारी 2024 पासून आयकर परतावा भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचा ITR भरण्यासाठी करदात्यांकडे 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. आयटीआर फाईन न केलेल्या करदात्यांना आजपासून आयकर परतावा भरताना दंड भरावा लागणार.

पासपोर्ट-व्हिसा नियम 

वर्ष 2024 पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत.

डिमॅट अकाऊंट

ज्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत डिमॅट अकाऊंटला नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट खात्यात नामांकन (Nominee)  जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. 

सॉफ्ट ड्रिंक्स महागणार

नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढल्याने ही उत्पादने महागली आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget