चांगल्या CIBILस्कोअरचे 5 फायदे कोणते? सविस्तर माहिती एका क्लिकवर
आर्थिक व्यवहार करताना CIBIL Score हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा CIBIL Score जर चांगला असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत.
CIBIL Score News: बँकांमध्ये आर्थिक व्यवहार (Financial transactions) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. डिजिटलच्या युगात बँका तुमच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन असतात. आर्थिक व्यवहार करताना CIBIL Score हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा CIBIL Score जर चांगला असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर तो चांगला मानला जातो. दरम्यान, तुम्हाला चांगला सीबील स्कोअरचे फायदे काय आहेत ते माहित आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
तुमचा चांगला सीबील स्कोअर असणं बँकेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. बँकेच्या दृष्टीनं तुम्ही एक चांगले ग्राहक समजले जाता. त्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणं महत्वाचे आहे. CIBIL स्कोर हा 300 आणि 900 दरम्यानचा तीन अंकी क्रमांक आहे. जो तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो. उच्च स्कोअर तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डवर त्वरित मंजूरी मिळण्यास मदत करतो. तुमचा सीबील स्कोकर चांगला असल्याचे फायदे कोणते?
कर्ज मिळण्यास मोठा फायदा
तुमचा जर सीबील स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही.
तसेच तुम्ही जर क्रेडिट कार्डसाठी एखाद्या बँकेकडे अर्ज केल्यास तुम्हाला त्वरीत क्रेडिट कार्ड मिळते. त्यामुळं तुमचा सीबील स्कोअर चांगला असणं खूप गरजेचं आहे.
कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध
तुमचा जर सीबील स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते किंवा तुम्ही व्याजदर कमी करण्यासह सांगू शकता. व्याजदर कमी केल्यास तुम्हाला याचा मोठा फायदा मिळतो. तुमच्या पैशांची बचत होते.
क्रेडिट मर्यादते वाढ
बराच काळ तुमचा सीबील स्कोअर चांगला राहिला तर तुमच्या क्रेडिट मर्यादेत देखील वाढ होते. याचा तुम्हाला चांगला फायदा मिळतो. बँका नेमहीपेक्षा जास्त मर्यादा देतात.
बँकांकडून मिळू शकते विशेष ऑफर
जर तुमचा सीबील स्कोअर चांगला राहिला तर तुम्हाला . बँकांकडून विशेष ऑफर देखील मिळू शकते. अनेकदा बँका प्रीमियम कार्डसारख्या ऑफर ग्राहकांना म्हणजे चांगला सीबील स्कोअर असणाऱ्यांना देतात. यामध्ये रिवॉर्ड पॉईंट देखील मिळतात.
कमी प्रीमियमवर विमा मिळण्यात मदत
तुमचा सीबील स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी प्रीमियमवर विमा मिळण्यात मदत होते. चांगला क्रेडीट स्कोअर असेल तर विविध कंपन्यांकडूव विमा मिळवण्यात मदत होते. तसेच प्रीमियमध्ये बचतही होते.
महत्वाच्या बातम्या:
CIBIl Score : बँकांचे कर्ज घेताना महत्त्वाचा असलेला सीबील स्कोर म्हणजे काय? तो कसा चेक करायचा?