एक्स्प्लोर

CIBIl Score : बँकांचे कर्ज घेताना महत्त्वाचा असलेला सीबील स्कोर म्हणजे काय? तो कसा चेक करायचा?  

CIBIl Score  : तुमचा सीबील स्कोर चांगला असेल तर तुम्हाला नवीन कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्या संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे.

CIBIl Score : बँकेत कर्ज घ्यायला जाताना आपल्याला पहिल्यांदा सीबील स्कोर विचारला जातो, त्या आधारेच आपल्याल्या बँका कर्ज देतात. त्यामुळे आपला सीबील स्कोर चांगला असला पाहिजे. पण सीबील स्कोर म्हणजे नेमकं काय आणि तो कसा तपासायचा हे आपण पाहुयात. 

CIBIL कसं काम करतं?

CIBIL ला भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेला आहे आणि 2005 च्या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज कायद्याप्रमाणे त्याचं काम चालतं. हे व्यक्ती आणि कंपन्यांसाठी क्रेडिट स्कोअर, क्रेडिट रँक आणि क्रेडिट अहवाल तयार करते. कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या नवीन कर्जांसाठी अर्ज मंजूर करण्यात हा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावतो.

बँका आणि इतर वित्तसंस्था जसे की NBFC त्यांच्या ग्राहकांचा डेटा, थकित कर्जाची रक्कम, परतफेड नोंदी, नवीन कर्ज, क्रेडिट कार्डसाठी अर्ज आणि इतर क्रेडिट संबंधित माहिती CIBIL ला सबमिट करतात. TransUnion CIBIL डेटाचे मूल्यांकन करते आणि क्रेडिट अहवाल तयार करते.

बँका किंवा NBFC CIBIL अहवालाच्या आधारे अर्जदाराला कर्ज देण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करतात आणि नंतर कर्ज, क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर करतात किंवा नाकारतात. त्यानंतर हा निर्णय CIBIL ला देखील कळविला जातो आणि ही माहिती भविष्यातील अहवालांमध्ये समाविष्ट केली जाते.

CIBIL स्कोर काय आहे?

CIBIL स्कोर ही तीन अंकी संख्या आहे. तो 300 ते 900 पर्यंत असते आणि एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची क्षमता दर्शवते. जेव्हा कोणी नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताक तेव्हा कर्ज देणारी संस्था अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासते आणि त्याला कर्ज देण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करते. चांगला क्रेडिट स्कोअर राखणे, म्हणजे 900 च्या जास्तीत जास्त जवळ जाणारी संख्या असेल तर   नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.

CIBIL स्कोअर कसा तपासायचा? (How To Check CIBIl Score)

तुमचा CIBIL स्कोर तपासण्यासाठी www.cibil.com या वेबसाईटला भेट द्या.

यानंतर तुम्ही होम पेजवर Get Your Free CIBIL Score पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचं नाव, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल.

ही सर्व माहिती भरल्यानंतर Accept आणि Continue पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो प्रविष्ट करा.

OTP टाकल्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल.

यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जावं लागेल. येथे तुम्हाला CIBIL स्कोर दिसेल, त्यासोबत तुम्ही तुमच्या नावावर किती कर्जे किंवा क्रेडिट कार्ड आहेत हे देखील तपासू शकता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Embed widget