Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
Budget 2022 Highlights: आर्थिक दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात 48 हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरं बांधणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, देशातील दुर्बल घटकांना तसेच केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या उद्देशासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. त्यामध्ये 80 लाख नवीन घरं बांधण्यात येतील
केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार घर खरेदीसाठी सबसिडी देते. या योजनेचा लाभ घेऊन आपण जास्तीत जास्त 2.67 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवू शकतो. नवीन घर खरेदी केल्यावर, लोकांना गृहकर्जावर सरकारकडून सबसिडी मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो.
बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे
- आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी.
- मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होणार.
- पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे.
- ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल.
- पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार.
- येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार.
- गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार.
- शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार.
संबंधित बातम्या:
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
- Income Tax: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी
- Budget 2020 : बजेटमध्ये डिजिटलायझेशन वर जोर! ई-पासपोर्टची सोय, पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग, जागांचं रजिस्ट्रेशनही डिजिटल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
