No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
Income Tax: केंद्रीय अर्थसंकल्पात कर रचनेमध्ये कोणताही बदल केला नाही
नवी दिल्ली: प्राप्तीकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कर रचना समान असेल.
टॅक्स स्लॅब उत्पन्न कर
2.5 लाख - कोणताही कर नाही
2.5 लाख ते 5 लाख - 5 टक्के कर
5 लाख ते 7.5 लाख - 10 टक्के
7.5 लाख ते 10 लाख - 15 टक्के
10 लाख ते 12.5 लाख - 20 टक्के कर
12.5 लाख ते 15 लाख - 25 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त - 30 टक्के कर
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आता काहीशी सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने या वर्षीच्या कर रचनेत बदल व्हावी आणि ती कमी करण्यात यावी अशी मागणी होत होती. पण या वर्षी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे
- आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी.
- मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होणार.
- पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे.
- ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल.
- पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार.
- येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार.
- गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार.
- शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार.
संबंधित बातम्या:
- Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
- Income Tax: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी
- Budget 2020 : बजेटमध्ये डिजिटलायझेशन वर जोर! ई-पासपोर्टची सोय, पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग, जागांचं रजिस्ट्रेशनही डिजिटल