बापरे बाप! 10 हजारांचे झाले तब्बल 5300000 रुपये, एका वर्षात 'या' शेअरने अनेकांना केलं मालमाल!
Best Stocks to invest : शेअर मार्केटमध्ये ही कंपनी गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करत आहे. ही कंपनी थेट मल्टिबॅगर ठरली आहे.
Sri Adhikari Brothers Television Network Share: शेअर बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्या फारशा चर्चेत नसतात. मात्र परताव्याच्या बाबतीत त्या अनेक नामांकित कंपन्यांच्या तुलनेत सरस ठरतात. श्री अधिकारी ब्रदर्स ही कंपनीदेखील अशीच आहे. या कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना चांगलंच मालामाल केलं आहे. या कंपनीचा शेअर एका महिन्यात तब्बल 53000 टक्क्यांनी वाढला आहे. याच कारणामुळे या शेअरने सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेअरचे मूल्य 922.25 रुपयांपर्यंत पोहोचले
सध्या या शेअरचे मूल्य 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या शेअरचे मूल्य 5 ऑक्टोबर 2023 रोजी 1.73 रुपये होते. शुक्रवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2024 रोजी या शेअरला थेट अपर सर्किट लागले आहे. शुक्रवारी या शेअरचे मूल्य 922.25 रुपयांपर्यंत पोहोचले होते. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या एका वर्षात 53000 टक्के परतावा मिळाला आहे.
10000 रुपयांचे झाले 50 लाख रुपये
या कंपनीने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगलंच मालामाल केलं आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे 10 हजार रुपयांचे शेअर्स घेतले असतील तर तेव्हा त्या व्यक्तीला एकूण 5780 शेअर्स मिळाले असते. आज श्री अधिकारी ब्रदर्स या शेअरचे मूल्य 922.25 रुपये आहे. म्हणजेच आजच्या हिशोबाने 5780 शेअर्सचे मूल्य आज 53 लाख 30 हजार 605 रुपये झाले असते. म्हणजेच अवघ्या 10 हजाराचे थेट 53 लाख रुपये झाले असते.
मस्ती, दबंग, धमाल गुजरात चॅनेल्सची मालकी
श्री अधिकारी ब्रदर्स या कंपनीची सब टीव्हीमध्ये हिस्सेदारी आहे. मस्ती, दबंग, धमाल गुजरात अशा चॅनल्सची मालकी श्री अधिकारी ब्रदर्स या कंपनीकडे आहे. Trendlyne या शेअर बाजारविषयक संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 59.10 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 40.25 टक्के आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मुकेश अंबानी यांच्याकडून बम्पर सूट, आयफोन 16 आता स्वस्तात मिळणार; वाचा नेमकी ऑफर काय?
कचरा मॅनेज करणारी कंपनी तुम्हाला करू शकते मालामाल; मिळाली तब्बल 908 कोटींची ऑर्डर; सोमवारी ठेवा नजर!