एक्स्प्लोर

मल्टिबॅगर कंपनीचा सेमिकंडक्टर क्षेत्रात प्रवेश, हजारो कोटींचा नवा करार; गुंतवणूक केल्यास पडणार पैशांचा पाऊस?

शेअर बाजारात काही काही कंपन्या अशा आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. सध्या अशाच एक कंंपनीने हजारो कोटी रुपयांचा नवा करार केला आहे.

CG Power Share: गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स देणाऱ्या सीजी पॉवर या कंपनीने शनिवारी (5 ऑक्टोबर) मोठी अपडेट दिली आहे. या कंपनीने रेनेसस इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन (Renesas Electronics Corporation)  या कंपनीसोबत तब्बल  3.6 कोटी डॉलर्सचा करार केला आहे. या कराराअंतर्गत सजी पॉवर या कंपनीने रेडिओ फ्रिक्वेन्सीकंम्पोनेंट्सच्या व्यवसायाचे अधिगृहण केले आहे. शुक्रवारी हा शेअर 2.59 टक्क्यांनी घसरून 718.80 वर पोहोचला. सीजी पॉवर या कंपनीने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 210 टक्क्यांनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिलेले आहेत. 

4 ऑक्टोबर रोजी झाला करार

स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार CG Power आणि Renesas या कंपनीची उपकंपनी Renesas Electronics America Inc यांच्यात 4 ऑक्टोबर 2024 रोजी असेट पर्चेसबाबत एक करार झाला आहे. या करारामुळे सीजी पॉवर्स या कंपनीला सेमिकंडक्टर डिझाईन उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. या करारानुसार मुरुगप्पा समुहाची (Murugappa Group)  सीजी पॉवर ही कंपनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी (IP), टँजिबल असेट्सचे अधिगृहण करेल.  

उद्योग समूहाचे बाजार भांडवल 77881 कोटी 

सीजी पॉवर या कंपनीने सीजी सेमी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक उपकंपनी स्थापन केलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून सीजी पॉवर ही कंपी आउटसोअर्स्ड सेमिकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंगचा (OSAT) उद्योग करणार आहे. सीजी पॉवर या कंपनीचा मुरुगप्पा उद्योग समूह हा 124 वर्षे जुना आहे. या उद्योग समूहाचे बाजार भांडवल 77881 कोटी रुपये आहे. शेती, इंजिनिअरिंग, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात हा उद्योग समूह काम करतो. या उद्योग समूहात एकूण 9 सूचिबद्ध कंपन्या आहेत. Carborundum Universal Limited, CG Power & Industrial Solutions Limited, Cholamandalam Financial Holdings Limited, Cholamandalam Investment & Finance Company Limited अशी या कंपन्यांची नावे आहेत.

सीजी पॉवर कंपनीची कामगिरी कशी राहिलेली आहे? 

सीजी पॉवर ही कंपनी मल्टिबॅगर रिटर्न्स देणारी कंपनी ठरलेली आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीने 66 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. तर गेल्या दोन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 210 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 41 टक्क्यांनी रिटर्न्स मिळालेले आहेत. चालू वर्षात हा शेअर साधारण 60 टक्क्यांनी वर गेलेला आहे. तर गे्या तीन वर्षात हा शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 468 टक्क्यांनीर रिटर्न्स देण्यात यशस्वी ठरलेला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget