एक्स्प्लोर

Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे पहिल्या रांगेत होते.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा, आणि नोकरदारांना आनंदाचा सुखद धक्का देणारा यंदाचा अर्थसंकल्प ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पापूर्वी भाषण करताना लक्ष्मी गरीब व मध्यमवर्गीयांना आशीर्वाद देईल, असे मोदींनी म्हटले होते. त्यानुसार, आज निर्मला सितारमण यांनी संसदेत टॅक्स फ्रीसंदर्भात घोषणा करताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) सर्वच मंत्री व खासदार महोदयांनी बाक वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं. नाऊ हॅप्पी टू अनाऊंस दॅट नो इन्कम टॅक्स अप टू इन्कम ऑफ ट्वेल्व लाख रुपीज... अशी घोषणा निर्मला सितारमण यांनी संसदेत करताच सर्वांना बाक वाजवून निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दणादणा बाक वाजवत आनंद व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे पहिल्या रांगेत होते. निर्मला सितारमण यांनी 12 लाख रुपयांच्या उत्पनाच्या मर्यादेपर्यंत कुठलाही टॅक्स सर्वसामान्य नागरिकांना लागणार नाही, अशी घोषणा केली. त्यावेळी, मोदींनी डाव्या हाताने बाक वाजून स्वागत केलं. तर, राजनाथसिंह व अमित शाह यांनीही मोठमोठ्याने बाक वाजवत आपला आनंद व्यक्त केला. नितीन गडकरी हेही बाक वाजवताना दिसून येत आहेत. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवेल, अशी चर्चा होती. मात्र, केंद्र सरकार इतकी मोठी सूट देईल, अशी अपेक्षा स्वप्नातही कोणी केली नव्हती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत 12 लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री असेल, असे सांगताच अनेकांना विश्वासच बसत नव्हता. या घोषणेनंतर अनेकजण ही गोष्ट खरी आहे का, हे वारंवार तपासून पाहत होते. त्यामुळे निर्मला अक्कांच्या या घोषणेनंतर सामान्य नोकरदारांना आनंदाचा दे धक्का बसाला आहे. या निर्णयामुळे सामान्य नोकरदारांच्या हातात आता जास्त पैसे उरणार आहेत. कर न लागल्याने पगारातील रक्कम कापली जाणार नाही. त्यामुळे देशातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढेल आणि ते खर्च करताना हात मोकळा सुटणार आहे.  

देशातील सर्व मध्यमवर्गीय हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात असतात. देशातील नागरिकांना 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर मुक्त आहे. सरकारने दिलेली ही सूट सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक बजेटमध्ये आनंद निर्माण करणारी असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स 

० ते 4 - Nil
4 ते 8- 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16 ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के

हेही वाचा

भारत सरकारने 20 हजार कोटींचा पेटारा उघडला; न्युक्लिअर पॉवर क्षेत्रासाठी गेमचेंजर निर्णय

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget