कचरा मॅनेज करणारी कंपनी तुम्हाला करू शकते मालामाल; मिळाली तब्बल 908 कोटींची ऑर्डर; सोमवारी ठेवा नजर!
कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीला नवी मुंबई महापालिकेची तब्बल 908 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे सोमवारी या कंपनीच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Antony Waste Handling Share Price: इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत सध्या तणावाची स्थिती आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र डागत आहेत. त्यामुळेच संपूर्ण जग युद्धाच्या छायेत आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे कचे तेल चांगलेच महागले आहे. याच परिस्थितीचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम पडत आहे. शुक्रवारी शेअर बाजाराचे सत्र संपले तेव्हा बीएसईचा सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे प्रमुख निर्देशांक गडगडले. मात्र सध्या काही कंपन्या आगामी काही दिवस चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. सध्या चालू असलेली कामे आणि भविष्यातील वर्कऑर्डर पाहता, या कंपन्यांचे शेअर्स भविष्यात चमकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कंपन्यामध्ये बेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्या Antony Waste Handling या कंपनीचाही समावेश आहे.
अँटोनी वेस्ट हँडलिंग या कंपनीला नुकतेच एक मोठे काम मिळाले आहे. एक्स्चेंज फायलिंगनुसार या वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला नवी मुंबई महापालिकेकडून 908 कोटी रुपयांचे एक कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीचा शेअर वर जाऊ शकतो. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) या कंपनीचा शेअर 2.83 टक्क्यांनी घसरून 698.95 रुपयांवर बंद झाला होता.
Antony Waste Handling Order: कंपनीला 908 कोटींची ऑर्डर
अँटोनी वेस्ट हँडलिंग कंपनीने शेअर बाजाराला या ऑर्डबद्दल माहिती दिली आहे. या कंपनीची उपकंपी AG Enviro Infra Projects Private या कंपनीला नवी मुंबई पालिकेचे हे 908 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. घनकचरा जमा करणे आणि त्याला वाहून नेणे असे या कंत्राटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कामाचे स्वरुप आहे. या वर्क ऑर्डर अंतर्गत एकूण 9 वर्षांचे हे कंत्राट आहे.
Antony Waste Handling Share: कंपनीची शेअर बाजारावरील कामगिरी कशी आहे?
कचरा व्यवस्थापन करणारी ही कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. एका आठवड्यात या कंपनीचा शेअर 3 टक्क्याने तर एका महिन्यात हा शेअर 2 टक्क्याने घसरला आहे. गेल्या तीन महिन्यांत हा शेअर 30 टक्के तर सहा महिन्यांत 40 टक्के वर गेलेला आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 86 टक्के रिटर्न्स दिले आहेत. दोन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवूकदारांना 125 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मोठी बातमी! मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री, जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी