एक्स्प्लोर
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोने दराची मोठी झेप, जानेवारीत सोनं तब्बल 4400 रुपयांनी वाढलं, जाणून घ्या कारणं...
Gold Rate : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण जानेवारी महिन्यात पाहायला मिळाली. त्यामुळं सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली त्यातून त्यांना चांगला परतावा मिळाला.
सोने दरात वाढ
1/5

अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्वेलर्स अन् रिटेलर्सकडून मोठ्या संख्येनं खरेदी सुरु असल्यानं 10 ग्रॅम सोन्याचा दर 83750 रुपयांवर पोहोचला आहे, हा दर ऑल इंडिया सर्राफा असोसिएशननं माहिती दिली.
2/5

1 जानेवारी 2025 ला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. 29 जानेवारीला दर 4360 रुपयांनी वाढून 83750 रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 93000 रुपयांवर पोहोचला आहे. काल चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली.
Published at : 30 Jan 2025 10:00 AM (IST)
आणखी पाहा























