एक्स्प्लोर

दीड जीबीच्या डेटाने आयुष्य हिरावलंय!

माहितीचा अफाट खजिना या मोबाईलने आपल्याला दिला आहे खरा. पण त्यातलं काय वापरायचं? किती वापरायचं? कुठे वापरायचं? हा कॉमनसेन्स मात्र दिला नाही. मोबाईल वापरताना जणू अक्कल गहाण पडते. मनावरचा ताबा सुटतो आणि आपल्या मनाचा ताबा तो मोबाईल घेतो.

बुलेटीन जवळपास सेट झालं होतं. पण पावणे आठ वाजले असतील, बातमी येऊन धडकली. पंजाबमध्ये रेल्वेने 10 ते 12 जणांना चिरडलं. बातमी उतरवली. पण  रेल्वेच्या अपघाताची भीषणता वाढतच होती. मृतांचा आकडा एव्हाना 50 वर पोहोचला. आणि मग एक दृश्य ठळकपणे समोर आलं. अपघात होतानाची दृश्ये एका मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली मिळाली आणि अपघातातल्या मृतांचा आकडा वाढण्यामागचं एक कारण समोर आलं. मोबाईल... रावण दहनाचा सोहळा अगदी रेल्वे रुळाला लागून. त्यामुळे हजारभर लोक रुळांवरच उभे होते. एका दृश्यात नीट पाहिलं तर रेल्वे येण्याआधी रुळांवर उभ्या असलेला प्रत्येक माणूस एक तर रावण दहन आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड तर करत होता, किंवा फेसबुकद्वारे लाईव्ह तरी करत होता. रेल्वे अगदी धडकण्याच्या आधीही प्रत्येकाच्या हातातले मोबाईल. रावणाच्या दिशेने लुकलुकत होते. त्यांच्या मोबाईलच्या मेमरीत रावणाचा सर्वनाश व्हर्च्युअली सेव्ह होत होता, पण आपल्या आयुष्याचा रिअल एंड मात्र दिसत नव्हता. अनेक अपघातग्रस्तांच्या मोबाईलमध्ये तो सेव्हही झाला असेल. पण आयुष्याचा गेम ओव्हर झाल्यानंतर लाईफलाईन मिळून काय उपयोग? आता या अपघाताला इतर कारणे असूही शकतील. त्याला नाकारणे अयोग्य ठरेल. मेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलूही नये. पण रेल्वेच्या रुळांवर उभे राहून मोबाईलमध्ये शूट करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. पण असं का होतंय? सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलवर हव्या असं का वाटतं? याचा शोध घ्यायला हवा! पूर्वी रस्त्याने जाताना ओळखीची माणसं दिसायची... कारण आपल्या प्रत्येकाच्या माना वर असायच्या. आजूबाजूच्या घटना, वस्तू.  त्यांचे आकार.  माणसं. त्यांचे आवाज,  पदार्थ. त्यांचे सुवास हे सगळं काही अनुभवायचं. पण आता समोरुन बाप गेला, तरी मुलाला आणि बापालाही पत्ता लागत नाही! कारण सगळ्यांच्याच माना त्या मोबाईलपायी झुकल्या आहेत. त्या अर्धा बाय पाव फुटाच्या विस्मयकारक दुनियेने आपल्याला जणू हिप्नोटाईज केलय. हल्ली लोकलमध्ये तर. हेडफोन घालून बहिरी झालेली आणि डोळ्यात मोबाईलची एचडी स्क्रीन घालून आंधळी झालेली माणसं नॉर्मल आणि पेपर किंवा पुस्तक वाचणारी माणसे ॲबनॉर्मल झाली आहेत. सोशल मीडियावर नोटिफिकेशन आलं नाही, तर अस्वस्थ होणारी पिढीच जन्माला आली आहे, असं माझं मत आहे! मोबाईल वाजलेला नसतानाही मोबाईल खिशातून काढून नोटिफिकेशन चेक किती जण करतात, हे तर वेगळं सांगायला नको! विशेष म्हणजे माणसांचे फक्त अटेन्शन मिळवण्यासाठीच काही जण सोशल मीडियावर असतात. अपेक्षित माणसांकडून रिप्लाय आला नाही, तर काही जण अस्वस्थच नव्हे. हिंसकही होतात म्हणे! माहितीचा अफाट खजिना या मोबाईलने आपल्याला दिला आहे खरा. पण त्यातलं काय वापरायचं? किती वापरायचं? कुठे वापरायचं? हा कॉमनसेन्स  मात्र दिला नाही. मोबाईल वापरताना जणू अक्कल गहाण पडते. मनावरचा ताबा सुटतो आणि आपल्या मनाचा ताबा तो मोबाईल घेतो. पूर्वी शेजारी मिक्सर आला, तर मत्सर वाढायचा. शेजारी फ्रीज आला, की आपली डोकी गरम व्हायची. ईर्ष्या वाढीस लागायची. पण आता त्याचीही गरज पडत नाही. एखाद्याच्या पोस्टला लाईक किती, कॉमेंट्स किती? त्याचे फॉलोअर्स किती? ही कारणे द्वेषासाठी पुरेशी आहेत. व्हॉट्सॅपवरचे ग्रूपमधले नोटिफिकेशन किती जण सीरियसली पाहतात? स्क्रोल करुन चॅट डिलीट करणारेही आहेत. पण न पटणाऱ्या मुद्द्यावरुन भांडून ग्रूप सोडणारेही हळवे आहेत. पण प्रश्न असा आहे, की त्यातून साध्य काय होतय? या मोबाईलने आणखी एक प्रमाद केला आहे. जगण्यातली एक्स्क्लुझिव्हिटीच कायमची संपवून टाकली आहे. कारण सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. पूर्वी... एखाद्या मुद्द्यावर अभ्यास केलेला... तो मुद्दा कोळून प्यालेला माणूस असायचा.. पण आता...  या व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या जमान्यात... प्रत्येक माणसाला सगळं काही माहित आहे. भले ते चुकीचे का असेना. कारण हल्लीचं जग.. फक्त परसेप्शनवर जगतय... इथे रियालिटीला फार महत्त्व नाही... प्रत्येक थरारक गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये असायला हवी... अशी काहितरी विचित्र आणि भ्रामक अपेक्षा सध्या प्रत्येकात आहे.. कारण या मोबाईलने खऱ्या आयुष्यातली एक्साईट्मेंटच घालवून ती तळहातावरच्या मोबाईलपुरती मर्यादित ठेवली आहे! असो... तर शेवटी जाता जाता एक अनुभव शेअर करतो... आम्ही मालवणला गेलो होतो... मित्राने डॉल्फिन राईडची व्यवस्था केली होती... सुमारे शंभर एक डॉल्फिन आजूबाजूला उड्या मारत होते... आमच्या सोबतची माणसे ते क्षण मोबाईलच्या स्टोरेजमध्ये सेव्ह करत होती... आम्ही ते आमच्या मनातल्या स्टोरेजमध्ये सेव्ह करत होतो... त्यांच्या व्हीडिओंचे काय झाले माहित नाही.... आमच्या मनातला व्हीडिओ १० वर्षानीही ताजा आहे! आपल्या प्रत्येकाच्या हातत अल्लाउद्दीनचा दिवा आला आहे... पण तो दिवा विझलाय, आणि आपण त्या अंधारातच चाचपडतो...  जे आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी टीव्हीबाबत बोलायचे, तेच आज आपल्याला मोबाईलबद्दल बोलावं लागतय...मोबाईल वाईट नाही... त्याचा अतिरेकी वापर वाईट आहे...  काल झालेला अपघात फेसबुकवर किती...जणांनी लाईव्ह पाहिला असेल? त्यांचं का झालं असेल? त्या फ्री मिळणाऱ्या दीड जीबीच्या डेटाने एकदा मिळणारं आयुष्य हिरवून घेतलंय...
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget