Mauni Amavasya : यंदाची मौनी अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 29 जानेवारीपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 29 January 2025 : यंदाची मौनी अमावस्या काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.

Astrology 29 January 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 29 जानेवारीपासून (Mauni Amavasya 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. खरं तर, 28 जानेवारीला रात्री 7 वाजून 32 मिनिटांनी मौनी अमावस्या सुरू झाली आणि 29 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 29 जानेवारीला मौनी अमावस्या तिथी पाळली जाईल.
मौनी अमावस्येला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. मौनी अमावस्येला सुखाचा कारक शुक्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. 31 मे पर्यंत शुक्र मेष राशीत राहील. मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. शुक्र राशी परिवर्तनामुळे 29 जानेवारीपासून कोणत्या राशींचे (Zodiac Signs) सोन्याचे दिवस सुरू होणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्या विशेष फलदायी ठरेल, या राशीच्या लोकांना शुक्राचा राशी बदल भरपूर सुख देऊन जाईल. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात बंपर लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. या काळात करिअरची नवीन सुरुवात करणं फायदेशीर ठरू शकतं. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासह, व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. तुम्ही पैशाची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
कर्क रास (Cancer)
29 जानेवारीपासून कर्क राशीच्या लोकांना सोन्याचे दिवस येतील. या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. शुक्राचं मीन राशीतील भ्रमण व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतं. नोकरी-व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. परदेशी कंपनीच्या माध्यमातूनही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही जोडीदारासोबत परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. कुटुंबात सुखाचं वातावरण राहील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र संक्रमणाचा काळ प्रगतीचा असेल. या काळात मीन राशीच्या लोकांच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता झपाट्याने वाढणार आहे, तुमचं नाव होणार आहे. व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यात, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट, ऑर्डर किंवा नवीन डील मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित लोक त्यांच्या आवडीनुसार जोडीदार शोधू शकतात. विद्यार्थ्यांनाही खूप फायदा होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
