एक्स्प्लोर
Astro Tips : घरासमोर कावळ्याचं काव-काव करणं शुभ की अशुभ? ज्योतिष शास्त्रात नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊयात...
Astro Tips : ज्योतिष शास्त्रानुसार, काही परंपरा अशा आहेत ज्यामध्ये घरासमोर कावळ्याचं काव काव करणं घरात पाहुणे येण्याचे शुभ संकेत समजले जातात.

Astro Tips
1/8

ज्योतिष शास्त्रानुसार, घरासमोर कावळ्याचं काव काव करणं अनेक संस्कृतीमध्ये शुभ मानलं जातं. मात्र, कावळ्याच्या काव-काव करण्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो.
2/8

काही परंपरा अशा आहेत ज्यामध्ये घरासमोर कावळ्याचं काव काव करणं घरात पाहुणे येण्याचे शुभ संकेत समजले जातात.
3/8

काही लोकांच्या मते, कावळा कुठल्या दिशेला बसला आहे. तसेच, तो कसा आवाज काढतो त्यावरुन तो शुभ की अशुभ संकेत देणारा आहे हे कसं ठरवायचं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात.
4/8

ज्योतिष शास्त्रानुसार, कावळ्याला पाणी पिताना पाहणं हा अनेकदा धनलाभाचा संकेत मानला जातो.
5/8

ज्योतिष शास्त्रानुसार, कावळ्याच्या तोंडात चपाती दिसली तर याचा अर्थ की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असा मानला जातो.
6/8

कावळ्याचं काव-काव करणं हे अनेकदा कार्यात बाधा येण्याचा देखील संकेत देतो. तसेच, हे एक प्रकारे शारीरिक आणि आर्थिक नुकसानीचे देखील संकेत असू शकतात.
7/8

वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, कावळा हा बुद्धिमान पक्षी आहे. कावळा आवाजाच्या माध्यमातून लोकांना धोक्याचे, किंवा इतर घडामोडींचे संकेत देतो.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 Feb 2025 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्राईम
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
