Shani Gochar 2025 : मौनी अमावस्येला शनि बनवणार शक्तिशाली राजयोग; 29 जानेवारीपासून 3 राशींना अच्छे दिन, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Ardhakendra Yog 2025 : मौनी अमावस्येला, म्हणजेच 29 जानेवारीला शनीमुळे अत्यंत शुभ योगाची निर्मिती होणार आहे. यामुळे 3 राशींना भरपूर लाभ मिळेल, तुमच्या जीवनात सुखाची लाट चालून येईल.
Mauni Amavasya Lucky Zodiacs : सर्व अमावस्यांपैकी मौनी अमावास्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या (Mauni Amavasya) म्हणतात. या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी शनि आणि बुधाचा संयोग होऊन शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे, हा योग काही राशींसाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे.
वैदिक पंचांगानुसार, 29 जानेवारीला दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी शनि आणि बुध एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल. सध्या शनि कुंभ राशीत स्थित आहे, तर बुध मकर राशीत आहे. दोघांच्या या स्थितीमुळे अर्धकेंद्र योग निर्माण होत आहे. या योगामुळे अनेक राशींचं भाग्य उजळू शकतं. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाने तयार केलेला अर्धकेंद्र खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीला व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असेल, यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. फायनान्स, बँकिंग आणि अकाउंटिंगशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पालकांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप भाग्याचा ठरेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यळ मिळेल. नोकरीनिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो, पण तुम्हाला त्यातूनही फायदा मिळेल. भागीदारीत केल्या जाणाऱ्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. परदेशी कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. जोडीदारासोबत परदेश प्रवास होऊ शकतो. तुमचं आरोग्य चांगलं राहील. लव्ह लाईफ देखील चांगलं राहणार आहे.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप फायद्याचा ठरेल. या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. नोकरीत कामाच्या स्वरुपात बदल होऊ शकतो, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे. 29 जानेवारीपासून या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही शुभ परिणाम मिळू शकतात. यशाचे अनेक मार्ग खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: