Sujay Vikhe Patil Full Speech : अश्रू अनावर,थोरांतावर तुटून पडले!सुजय विखेंचं खणखणीत भाषण...
Sujay Vikhe Patil Full Speech : अश्रू अनावर,थोरांतावर तुटून पडले!सुजय विखेंचं खणखणीत भाषण...
एका आठवड्याचाआपला चमत्कार पहा आज अंभोरे गाव महाराष्ट्रात पोहोचलं... धांदरफळ येथे केलेल्या वक्तव्याचा मी महायुतीच्या वतीने निषेध व्यक्त करतो ते वक्तव्य कुठल्याही संस्कृतीला शोभणारा नाही. जो कोणी असं वक्तव्य करत असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असं माझं मत... माझ्या व्यासपीठावर एका 75 वर्षाच्या व्यक्तीने हे वक्तव्य करणं चुकीचं आहे माझ्या परिवाराच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो... आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे... मी आज या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो... आता मला पाहायचं आहे त्या घटनेनंतर आमच्या जाणाऱ्या गाड्यांमधील महिलांना बाहेर काढून काढलं त्याच्याबद्दल माफी मागणार का तुमच्या दानात असेल तर माफी मागून दाखवा... जो न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला... तसा न्याय एका आदिवासी महिलेला मिळतो की नाही ते पाहायचं आहे... तुमच्याबद्दल वक्तव्य करणारा माणूस आज जेलमध्ये आहे आणि आमच्या महिलांवर ज्या पद्धतीने तुमचे कार्यकर्ते वागले ते बाहेर फिरत आहे... या तालुक्यात न्याय असेल तर पोलिसांना विनंती करेल.. जो न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला.. तो न्याय सर्वसामान्य घरातल्या मुलीला सुद्धा द्यायला हवा ज्या माणसाने माझ्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात लढायला वकील सुद्धा सुजय विखेच देईल महिलेच्या अपमानासाठी मी हे करेल... माझ्या स्टेजवर बोलले म्हणून माझी संस्कृती काढण्यात आली... आणि जर असं करत असेल तर लाव रे तो व्हिडिओ म्हणत ( बाळासाहेब थोरात यांचं शिर्डीतील भाषण दाखवले ) यांनी प्रत्येक वेळेस यांच्या व्यासपीठावर असे लोक उभे केले त्यांनी सातत्याने माझ्या वडिलांवर टीका केली.. मी सगळं सहन केलं.. एकही सभा उधळली नाही.. आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता आमची सहनशीलता आमची कमजोरी समजू नका उद्या कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधात बोललं तर याद राखा टायगर अभी जिंदा है तुमच्या स्टेजवर जी भाषा वापरतात हा तुमचा सूसंस्कृतपणा का.. त्यांच्याकडे बोलण्यासाठी विकास नाही म्हणून अशा प्रकारच्या टीका आमच्यावर करतात आता कोण कोणाला पाडतं हे आपण बघूच तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की... मै जब भी रुका हु डुबनी रफ्तार से निकला हु... भगिनी जयश्री थोरात यांना विचारतो मी एकदा तुमच्या वडिलांबद्दल बोललो तर एवढं लागलं आणि माझ्या वडिलांबद्दल तुमच्याकडून इतके वेळा बोललं गेलं तर मला काय वाटलं असेल... आमचे लोक संयमी आहे... पण आता हे होणार नाही... माझ्या व्यासपीठावर जरी कोणी असं वक्तव्य केलं किंवा आता तुमच्या जरी केलं तरी त्यांना उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे... त्यादिवशी सभा संपल्यानंतर संगणमेर तालुक्याच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर अनेकजण वाट बघत होते.. माझ्यावर काही झालं आणि कार्यकर्त्यांना फोन केले तर गोळा व्हायला दोन तास लागतील... कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे कामात असतो...आणि असं काय झालं त्या दिवशी की अर्ध्या तासात तलवारी काठ्या कोयते घेऊन कार्यकर्ते एकत्र जमा झाले अर्ध्या तासात होऊ शकता का... ज्या व्यक्तीने बोलला तो बाजूला.. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मारलं गेलं.. हे सगळे महाराष्ट्राने पाहिलं... यांच्या जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीत काँग्रेसचे झेंडे काठ्या खुराड हे सगळं दिसून... यांचा हा डाव दोन दिवसांपूर्वी रचलेला डाव.. यांना मला मारायचच होत आणि हे हल्ला करणाऱ्या आमदाराचा भाऊ त्यांचे पीए आणि जिल्हा परिषद सदस्य होते... तुमच्याच तालुक्यातले लोक आणि यांना तुम्हीच मारत होते... आपण कोणाला घाबरत नाही.. ही दडपशाही हुकुमशाही कोणाला दाखवता.. या तालुक्यातील माझ्या एकाही कार्यकर्त्याला धक्का लागला.. नुसता टायगर म्हणणार नाही टायगर कसा काय वार करतो हे सुद्धा सुजय विखे दाखवून देईल