(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report Nagpur Voter: नागपुरात मतदार याद्यांमध्ये घोळ समोर, लोकसभेसाठी 54 टक्के मतदान
हे आहेत सुरेश वैतागे ( हिरवा शर्ट घातलेले).... सध्या ते निवडणूक आयोग आणि नागपूर जिल्हा प्रशासनावर कमालीचे वैतागलेले आहेत... कारण निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे सुरेश वैतागे मतदानापासून वंचित राहिलेच.. मात्र जिवंतपणे त्यांना मृत असल्याचा आरोपही सहन करावा लागलाय... 19 एप्रिल ला सुरेश वैतागे जेव्हा महाल परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचले, तेव्हा त्यांचा नाव निवडणूक यंत्रणेकडील यादीत नव्हता... त्यांच्या नावासमोर डिलीटेड असा शिक्का होता... विचारल्यावर तुम्ही मृत आहात असे सांगण्यात आले... मुळात सुरेश वैतागे यांच्या भावाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, आणि त्यांचे नाव यादीतून डिलीट करत असताना निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सुरेश वैतागे यांचाही नाव सोबत डिलीट करून टाकला...
सुरेश वैतागे सारखेच अनुभव शेकडो नागपूरकरांना मतदानाच्या दिवशी आले... ते जिवंत असताना त्यांचे नाव डिलीटेड श्रेणीमध्ये असल्याने कित्येक मतदार मतदान करू शकले नाही... दरम्यान उपदेव कुटुंबाची कहाणी तर आणखी धक्कादायक आहे... मेघा भालचंद्र उपदेव यांचा मृत्यू 2008 मध्येच झालं आहे... नियमानुसार उपदेव कुटुंबाने 2008 पासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला मेघा उपदेव आता जिवंत नाही, त्यांचा नाव मतदार यादीतून काढा असे निवडणूक यंत्रणेला वारंवार कळवले.. एवढेच नाही, तर मृत्यू प्रमाणपत्र ही वारंवार निवडणुक यंत्रणेकडे जमा केले.. तरीही 2009, 2014, 2019 आणि आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत मेघा भालचंद्र उपदेव यांचे नाव मतदार यादीत कायम आहे... हजारो मृत आणि स्थलांतरित मतदारांचे नाव मतदार यादीत कायम राहिल्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार नाही का? बोगस मतदानाला संधी मिळणार नाही का? असे रास्त प्रश्न उपदेव कुटुंबीयांनी उपस्थित केले आहे...
नागपूर जिल्हा प्रशासनानं यंदा नागपुरात मतदानाचा टक्का वाढेल, नागपूरकर 75 टक्के मतदान करून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होतील असा दावा केला होता... मतदारांना मतदान केंद्रांवर विविध सोय उपलब्ध करून देऊ असा दावा करत मोठा खर्च करत वेगवेगळ्या थीम द्वारे मतदान केंद्र सजवले होते... मात्र मोठमोठ्या घोषणा करणारा नागपूर जिल्हा प्रशासन मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करू शकला नाही, मतदारांना मतदान केंद्रावर सावली आणि पाण्याची प्राथमिक गरजही भागवू शकला नाही, आणि त्याचाच जोरदार फटका नागपूरकर मतदारांना बसला आहे... मतदार यादी मधील या गोंधळाचा राजकीय फटका कोणाला बसेल हे मात्र 4 जूनला स्पष्ट होईल...