Dalami Lama : जागतिक धम्म परिषदेला धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार
मुंबईत १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेला धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. त्यानिमित्त मुंबईत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवलं. त्यानंतर बाबासाहेबांनी १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे धम्मदीक्षा सोहळा घेण्याचा संकल्प जाहीर केला होता. पण त्याआधीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेब आंबेडकरांचा अधुरा संकल्प पूर्ण करण्यासाठी धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/4aba3f9617c7a10899e158ab8cdc7e63173867574664790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)