एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला राज्याच्या विकासाचा रोडमॅप   

Devendra Fadnavis : फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  दिली आहे. मुंबई टेक वीक 2025चा आज (28 फेब्रुवारी) शुभारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यामध्ये तसेच  कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

आगामी पाच वर्षांत तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, वॉर रूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉर रूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणले आणि त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळाली, असे फडणवीस म्हणाले.

आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर  हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जे.एन.पी.टी.पेक्षा तीनपट मोठा असून, 20 मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याच बरोबर  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात उत्तर देताना  फडणवीस म्हणाले की, आज जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2000 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.  मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे  नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईतील दडपण कमी होईल, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Embed widget