एक्स्प्लोर

Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेवर वादाचं सावट? नितेश राणे भेट देणार, मुस्लिम व्यापाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

Kanifnath Mandir Madhi : अठरापगड जातीच्या, सर्व धर्मीयांची होळी म्हणून आजपर्यंत गडावर होळी पेटवली जात होती. हिंदूंसह मुस्लिम बांधव या होळीसाठी शेणाची गोवरी देत असतात असं मुस्लिम व्यापाऱ्यांनी म्हटलंय. 

अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेत एकही मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना दुकान लावण्यात बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या निर्णयानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मढीतील मुस्लिम व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून मढीतील यात्रा ही शांततेत पार पाडावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, शनिवारी राज्याचे मंत्री नितेश राणे या ठिकाणी भेट देणार आहेत. 

सर्वधर्मियांची यात्रा म्हणून ओळख

शुक्रवारपासून मानाची होळी पेटवून मढीच्या कानिफनाथ यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मढी गावातील मुस्लिम बांधवांनी आणि व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांना निवेदन दिले. मढी यात्रा सर्व धर्मींची एकतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. अठरापगड जातीच्या, सर्व धर्मीयांची होळी म्हणून आजपर्यंत गडावर होळी पेटवली जात होती. हिंदूंसह मुस्लिम बांधव या होळीसाठी शेणाची गोवरी देत असतात. हा सण सर्व धर्मीय मिळून साजरा करावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती मढी गावाचे ग्रामस्थ फिरोज शेख यांनी दिली.

शनिवारी मढी येथे राज्याचे मंत्री नितेश राणे हे येणार आहेत. या दरम्यान काही चिथावणीखोर वक्तव्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही यात्रा शांततेत व्हावी यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा ठराव

या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरपंचांनी याची माहिती दिली. ते म्हणाले की, "या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. यात्रेच्या या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि खॉटही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच लागते."

ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस

यानंतर मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसत असून याबाबत गटविकास अधिकार्‍यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला जाईल, असं गटविकास अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Ahilyanagar Success Story : शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget