एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: योगेश कदम नवे, त्यांचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने दर्शवलं, तरीही सर्वांनी संवेदनशील असावं, मुख्यमंत्र्यांचा सल्ला!

Devendra Fadnavis on Yogesh Kadam: योगेश कदम म्हणाले, तरूणीने आरडाओरडा केला नाही, नाहीतर तिच्या मदतीसाठी लोक धावले असते, असं वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुणे: स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. जवळपास 500 पोलिसांचा बंदोबस्त, स्थानिक नागरिकांची मदत गाडेला पकडण्यासाठी घेण्यात आली. दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली, पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना योगेश कदम म्हणाले, तरूणीने आरडाओरडा केला नाही, म्हणून बलात्कार झाला, असं वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरती विरोधकांनी हल्लाबोल केला, त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लोकप्रतिनिधी यांनी सेन्सेटिव्ह बोललं पाहिजे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते ते चुकीच्या पद्धतीनं पोट्रे झालं आहे. ते नवीन आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी म्हणेल सेन्सेटिन्ह बोललं पाहिजे. लोकप्रतिनिधी यांनी सेन्सेटिव्ह बोललं पाहिजे असा माझा सल्ला असेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. 

गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

गृहराज्यमंत्री कदम यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना पोलिसांना पाठिंबा दिला आहे. या घटनेला डेपो मॅनेजर जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तर "विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतंही आर्युमेंट, कुठलंही फोर्स, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असं काहीच घडलेलं नाही. ज्यावेळी आरोपी ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल", असं तिने म्हटलं आहे. 

विजय वडेट्टीवारांचा योगेश कदमांवर हल्लाबोल

योगेश कदम व संजय सावकारे यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावा, सरकारने दोघांनाही पाठीमागे घालू नये, दोघांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. योगेश कदम मुलीला खोटे ठरवत आहे का? पीडितला मुलीला आरोपी ठरवत असल्याने नाराजी व्यक्त केली. ही भूमिका योगेश कदम यांची आहे की, सरकारची हे सरकारने स्पष्ट करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

तर यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजे - संजय राऊत

संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, एका महिलेवर मुलीवर होणाऱ्या जर अशा पद्धतीच्या घटना यांना सामान्य वाटत असतील, तर यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजेल. काल राज्याचे गृहराज्य मंत्री महणाले, बलात्कार हा शांतपणे सुरू होता. त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही, तिने शांतपणे होवू दिलं सगळं मग आम्हाला कसं कळणार. महिलांवरील अत्याचार संदर्भात मंत्री किती असंवेदनशील आहेत, मग बलात्काराला राजमान्यता द्या, कॅबिनेटमध्ये असा ठराव मंजूर करावा. विरोधी पक्षाने आवाज उठवला म्हणून तर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून आरोपाचा शोध घेतला. संजय सावकारे हे मंत्रीच आहेत. अशा घटना होत असतात अस म्हणतात. आमच्या आर.आर.पाटील यांनी बडे शहर मे छोडी घटना होती है, असं म्हटल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतके असंवेदनशील लोक जर तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget