(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Shinde : सूर्या प्रकल्प पाईपलाईन अपघात, 17 दिवसांपासून बचावकार्य, लष्करालाही पाचारण : मुख्यमंत्री
CM Eknath Shinde : सूर्या प्रकल्प पाईपलाईन अपघात, 17 दिवसांपासून बचावकार्य, लष्करालाही पाचारण : मुख्यमंत्री
सूर्या प्रकल्प दुर्घटनेच्या बचावकार्याची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी... आर्मी, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांकडून बचावकार्य सुरू
वसईतील वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी पोकलेन ऑपरेटर राकेश यादवांच्या नातेवाईकांनी सरकार विरोधात तीव्र नाराजी दर्शवलीय. गेल्या १७ दिवसांपासून राकेश यादव यांचा शोध सुरू असून काम सुरू असताना सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं ही दुर्घटना घडलीय. दरम्यान या दुर्घटनेनंतर ४ दिवसांपासून बचावकार्य थांबवण्यात आल होतं मात्र मुख्यमंत्री येणार म्हणून मशीन पुन्हा आणण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय.
पोकलेन ऑपरेटर राकेश यादवांच्या नातेवाईकांची तीव्र नाराजी मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू केलं, कुटुंबियांचा आरोप १७ दिवसांपासून पोकलेन ऑपरेटर राकेश यादवांचा शोध सुरू गेल्या ४ दिवसांपासून बचावकार्य बंद होतं, यादव यांच्या पत्नीचा आरोप