ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत होणार बदल...एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी बदलणार नियम
पालकमंत्री नियुक्तीचा तिढा असतानाच अजित पवारांच्या दालनात शिंदेंच्या आमदारांशिवाय रायगडची डीपीडीसी बैठक, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे सहभागी तर अदिती तटकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती
नाशिकमध्ये शिंदेंच्या सत्काराच्या नियोजन बैठकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर... एकनाथ शिंदेंच्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास कांदेंचा माजी नगरसेवकांना दम
जिल्ह्यात नियुक्त पालक सचिवांपैकी अकराजण संबंधित जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचं उघड, पालक सचिवांच्या अनास्थेमुळे कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस संतप्त
मुंबईत धूसफूस असताना दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका मंचावर.. पवारांच्या हस्ते शिंदेचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने होणार सन्मान
बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंतांच्या मुलाला परत आणण्यात मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका, मंत्री मोहोळ यांच्या मध्यस्थीनंतर विमान माघारी
आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरुन आव्हाडांनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर.. तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, आव्हाडांचा नवा आरोप..
तुमची बोलण्याची वेळ संपलीय, पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवरुन खासदार सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांना सूचना, अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यानची घटना
-----------------------
((तुमची बोलण्याची वेळ संपलीय - सुनेत्रा पवार))
किल्ले रायगडावर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेची सांगता.. लाखोंच्या संख्येने शिवप्रेमींची गर्दी
राहुल सोलापूरकरांविरोधात भीम अनुयायांचं पुण्यात आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एआय समिटच्या मंचावर दाखल, मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त, पंतप्रधानांचं वक्तव्य, एआयमुळे येणाऱ्या संकटाचंही भान ठेवण्याचं आवाहन




















