(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं
Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं
माजी आमदार वैभव नाईक बोलता बोलता गहिवरले, मात्र भाषणात आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराच निलेश राणेंना दिला
आपला पराभव कशामुळे झाला हे निकाला दिवशी समजलं. त्यामुळे आपण चिंतन करण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी ही बैठक आहे. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आता मला आमदार म्हणून हाक मारू नका तर वैभव नाईक म्हणून हाक मारा. आमदार हे पद आयुष्यभर मलाच भेटेल असा टीळा लावून कोणी येत नाही. आपल्या सोबत जी लोकं राहतील त्यांना घेऊन काम करायचा निश्चय केला. माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोक हळहळले, त्यांनी अनेकांनी फोन केले, हाच माझा विजय आहे.
नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेल्या निलेश राणे चं अभिनंदन केलं. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं की ही लोकशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच वैभव नाईक यांनी निलेश राणेंना दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत ७२ हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरू हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असा दम देखील यंत्रणेला वैभव नाईक यांनी दिलाय.
निवडून आलेल्यांनी चागलं काम करावं असा टोला मारत बहिणींना १५०० वरून २१०० रुपये द्यावे. मात्र २१०० बंद झाले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल.
हिंदू खतरे मे है असं म्हणता आणि १५ वर्ष केंद्रात सत्ता करता. लोकांना फसवता मात्र या भूमिका जास्त काळ टिकणार नाहीत.
आमदार ही पदवी मी स्वतः मिरवण्यासाठी वापरली नाही असं बोलत असताना हुंकारे देत वैभव नाईक गहिवरले. त्यांना आपल रडू आवरता आले नाही. त्यामुळे त्यांनी भाषण थांबलं.