Special Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?
Special Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?
उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात दिसलेल्या एका सुंदर तरुणीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ही तरुणी एका व्हिडीओत ती स्वत:ला साध्वी असल्याचं सांगत होती. त्यानतंर हा व्हिडीओ देशभरात चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, देशभरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर मात्र या तरुणीबाबत वेगळी माहिती समोर आली आहे. या तरुणीचे नाव हर्षा रिछारिया असून तिने मी साध्वी नसल्याचं म्हटलंय.
काही तासांत हर्षा रिछारिया प्रसिद्ध
हर्षा रिछारिया या सुंदर तरुणीला सोशल मीडियावर सुंदर साध्वी, व्हायरल साध्वी म्हणून प्रसिद्धी मिळाली. सगळीकडे तिचीच चर्चा होती. या प्रसिद्धीमुळे तिचे इन्स्टाग्रामवर काही तासांत एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले. तिला काही तासांत साधारण पाच लाख लोकांनी फॉलो केलं आहे. असं असतानाच तिने मात्र मी साध्वी नसल्याचं सांगितलं आहे. मी एक साधी दिक्षा घेतलेली असून मला साध्वी असल्याचा टॅग देऊ नका, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.