आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी
उष्णतेपासून सुटका व्हावी यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरने (Ayurvedic Doctor) झकास असा देशी जुगाड केला आहे. या डॉक्टरने आपल्या एक्स यु व्ही कारला चक्क गाईच्या शेणाचे लेपन केले आहे.

सोलापूर : सध्या उन्हाचा पारा (Heat) चांगलाच वाढत असल्याचं चित्र दिलस आहे. बहुंताश ठिकाणी तापमानाचा (Temperature) पारा 35 ते 40 अंशावर पोहोचला आहे. अशातच उष्णतेपासून सुटका व्हावी यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरने (Ayurvedic Doctor) झकास असा देशी जुगाड केला आहे. या डॉक्टरने आपल्या एक्स यु व्ही कारला चक्क गाईच्या शेणाचे लेपन केले आहे. यामुळं आपणास अनेक फायदे होत असून तपमान चक्क 50 टक्के कमी जाणवत असल्याचा दावाही केला आहे.
गाईचे शेण हे रेडिएशन विरोधी
पंढरपूर मध्ये असलेले आयुर्वेदिक डॉक्टर राम हरी कदम हे गेल्या अनेक वर्षंपासून देशी गाईचे शेण आणि गोमुत्राचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करत आले आहेत. देशी गाईच्या शेणाची ताकद खूप मोठी असून याचे फायदे लोकांना कळावेत यासाठी त्यांनी चक्क आपल्या एक्स यु व्ही या कारला गाईच्या शेणाचा लेप दिला आहे. यामुळे ही गाडी अतिशय वेगळी आणि युनिक दिसू लागली असून आता मला गाडी पुसण्याची गरज पडत नाही असे डॉक्टर कदम सांगतात. यामुळे उन्हाचे जे दुष्परिणाम होतात तो कुठलाही त्रास गाडीला आणि मला होत नाही. गाईचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याने या उन्हामुळे ना गाडीचा रंग खराब होतो ना इतर त्रास जाणवतो असे कदम सांगतात. याशिवाय गाडीत बसल्यावर इतर गाड्यांपेक्षा 50 टक्के उष्णता कमी होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
घरातील सिमेंटच्या भिंतींनाही रंग देण्याऐवजी गाईच्या शेणाचे लेपन
डॉक्टर कदम यांनी आपल्या घरातील सिमेंटच्या भिंतींनाही रंग देण्याऐवजी गाईच्या शेणाने असे सुरेख लेखन केले आहे की हा एखादा स्पेशल रंग आहे का असे समोरच्याला वाटते. यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागली असून घराचे तापमानही 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे डॉक्टर कदम सांगतात. याशिवाय या सारवलेल्या भिंतीत झोपल्यानंतर होणारी झोपही खूप शांत आणि प्रसन्नदायी असल्याचे त्यांच्या पत्नी सांगतात. मात्र ,एक्सयूव्ही सारख्या कारला अशा पद्धतीने शेणाचे लेपन केल्याने आज रेंज रोवर आणि फॉर्च्यूनर घेऊन फिरणारे लोकही थांबून माझी गाडी बघून जातात, यातच मला आनंद असल्याचे डॉक्टर कदम सांगतात. यामुळे देशी गाईचे शेण आणि गोमुत्राचे फायदे चर्चेत येऊन याचा जास्तीत जास्त वापर समाजात झाल्यास रोगमुक्त आणि व्याधीमुक्त समाज निर्माण होईल अशी आशा डॉक्टर कदम यांना वाटते.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Weather Update:उष्णतेची लाट विरली;आता विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
