Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
Sanjay Kumar Mishra : 2018 मध्ये त्यांना प्रथम दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु सरकारने त्यांना अनेक वेळा मुदतवाढ दिली होती.

Sanjay Kumar Mishra : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) पूर्णवेळ सदस्य म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मिश्रा 1984 च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे आयआरएस अधिकारी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानं पद सोडले
2018 मध्ये त्यांना प्रथम दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु सरकारने त्यांना अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये पद सोडले. मिश्रा यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक माजी मंत्री आणि शक्तिशाली नेत्यांवर कडक कारवाई केली होती, तपास संस्थेने सुमारे 4 हजार प्रकरणे नोंदवली होती आणि 3 हजारहून अधिक शोधमोहीम राबवल्या होत्या.
Pets never retire. Always on the payroll. pic.twitter.com/JOSlq2Tz1H
— Congress Kerala (@INCKerala) March 26, 2025
अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी
ईडी प्रमुख म्हणून मिश्रा यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी केली. यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांचा या चौकशीत समावेश आहे. त्यांच्या कार्यशैलीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. परिषदेचे माजी अध्यक्ष बिबेक देबरॉय यांच्या निधनानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे आर्थिक धोरणे आणि प्रशासकीय कार्यक्षमतेबद्दल परिषदेला नवीन दृष्टीकोन मिळण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आर्थिक आणि संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी EAC-PM ही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली होती.
Modi Govt had extended the tenure of Sanjay Mishra as ED chief TWICE in violation of Supreme Court orders.
— Saket Gokhale MP (@SaketGokhale) March 26, 2025
Eventually, the SC struck down his extension & forced him out.
This crook who deployed the ED to target Opposition has now been made a member of PM’s Economic Advisory… pic.twitter.com/PGBvajjfsD
सध्या, EAC-PM ची रचना अशी आहे
सुमन बेरी (अध्यक्ष), संजीव सान्याल (सदस्य), शमिका रवी (सदस्य), राकेश मोहन (अर्धवेळ सदस्य), सज्जिद चिनॉय (अर्धवेळ सदस्य), नीलकंठ मिश्रा (अर्धवेळ सदस्य), नीलेश शाह (अर्धवेळ सदस्य), टीटी राम मोहन (अर्धवेळ सदस्य) आणि पूनम गुप्ता (अर्धवेळ सदस्य).
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?





















