एक्स्प्लोर
Akola Truck Accident : भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर
Accident : अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने एका खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक दिली आहे. यात स्कूल वाहनातील तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय.
Akola Truck Accident
1/7

अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने एका खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक दिली आहे. यात स्कूल वाहनातील तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
2/7

अकोल्यातल्या पातुर बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा अपघात झाला. बाळापूरकडून वाशिमकडं जाणाऱ्या ट्रकने एका स्कूल वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय.
3/7

ट्रकमध्ये जवळपास 20 टन लोड असल्याचे समजते आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात जवळपास दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत.
4/7

सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5/7

अपघातानंतर संतप्त नातेवाईकांचं स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
6/7

वाडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ राहत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात.
7/7

त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा तसेच वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात यावे अशा मागणीसाठी या गावकऱ्यांचा रास्ता रोको सुरू आहे.
Published at : 26 Mar 2025 01:33 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















