एक्स्प्लोर

Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहिती

Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहिती

उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

- आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मस्साजोग गावातील शिवारात 32 एकर जमिनीवर गोडाऊन केले.

- सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. 

- 8 ऑक्टोबर पासून खंडणी  प्रकरणाला सुरुवात. आठ ऑक्टोबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. वेळ सायंकाळी सात वाजता किती मिनिट झाली. वाल्मीक कराडने दोन कोटीची खंडणी मागणी करून काम थांबवा असे सांगितले. (या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे)

- 9 ऑक्टोबर 2024 थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याची माहिती दिली. व पोलिस तक्रार द्यावी का? अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका असे सांगितले त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही. 

- 26 नोव्हेंबर 2024 सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे. तो कराडचा निकटवर्तीय आहे. साडेअकरा वाजता तो साइटवर गेला. शिवाजी थोपटे याला धमकी दिली. कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असे सांगितले. वाल्मीक कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला. 

- 29 नोव्हेंबर 2024  सकाळी साडेअकरा वाजता वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील शिंदे यांना फोन केला. सुदर्शन घुलेने सांगितले त्या पद्धतीने काम करा. अन्यथा कंपनी बंद करा असे सांगितले. यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता. तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते. थोपटे यांनी वाल्मीक कराड यांचा आवाज ओळखला.(वाल्मीक करडांच्या आवाजाच्या नमुनाचे पुरावे) शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता. 

- 29 तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटला व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला. याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे. 

- 29 तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता. वाल्मीक कराड व इतर सर्व आरोपी विष्णू चाटे च्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन, पुरावे आहेत. 

- 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिस मध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. हा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेला वाद यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना दिली हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक  7 डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. 

- 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला सुदर्शन घुलेने फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, अशी कबुली घुले यांनी दिली आहे. (त्याचे सीडीआर आणि इतर पुरावे सादर केले आहेत)

- 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोड वर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मीक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा. (या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत)

- 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेम  साठी ही केस तयार आहे. असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट, Siddhivinayak मंदिरात सुरक्षा वाढवली
Delhi Blast Probe : i20 कार Faridabad वरून Delhi त, Sunheri Masjid जवळ संशयित कैद
Delhi Blast : 'ती कार आमची नाही', Pulwama तील Amir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा, तिघे ताब्यात
Delhi Blast: दिल्ली स्फोटावर Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA चे DG Sadanand Date उपस्थित.
Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटात श्राप्नेलचा वापर नाही, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Embed widget