Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM
देशात नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान सुुरू होणार. भारतीय हवामान खात्याची माहिती.
१ नोव्हेंबर २०२४ पासून सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश होणार. १ मे २०२४ रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचे नाव लावणे बंधनकारक. वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नाही.
राज्यातील ११ हजार कोटींच्या रस्ते कामासाठी १९ निविदा. नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि पुणे वर्तुळाकार महामार्गाच्या सहा टप्प्यांतील कामासाठीच्या निविदा.
बीड जिल्ह्यातील २९२ गावातील पाणी दूषित, नमुने तपासणीनंतर आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आव्हान.
अकोल्यात अंगणवाडीतील लहान बालकांसह गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराला कीड, अनेत पोषण आहाराची पाकीटे एक्सपायर, बोरगाव मंजूमधील संतापजनक घटना
गणेशोत्सव संपत आला तरी अजून राज्यातील बहुतांशी गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही शिवाय शिध्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट काँग्रेसचा सरकारवर आरोप,
परभणीच्या पुर्णा पंचायत समितीवर दिव्यांग आणि निराधार भगिनींच्या मागण्यांसाठी प्रहारचा मोर्चा, पूर्णा गट विकास अधिकाऱ्यांच्या नामपलकाला केला बांगड्यांचा आहेर.