ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अंजली दमानियांना बीडच्या पोलिसांची नोटीस, संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तीन आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्याचे पुरावे द्या अशी नोटीस..
बीड हत्याप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा,, मुख्यमंत्र्यांचे आदेश... तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का दमानियांचा सवाल
नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं कमर्शियल फ्लाइट उतरणार, इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट सकाळी ११ वाजता होणार लँड..
मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावाही सोडावा, विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन सल्ला, दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी हमी..
पुण्यात सदाशिव पेठेत भिंतीला हिरवा रंग लावून हार,फुलं आणि उदबत्ती लावून पूजा, खासदार मेधा कुलकर्णींनी फासला भगवा रंग...
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार.. तर ३० दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश
आळंदीत इंद्रायणी नदी प्रदुषणामुळं फेसाळली, आठवड्याभरापासून रसायन आणि मैलायुक्त पाण्यानं इंद्रायणीचं पाणी अपवित्र..
दक्षिण कोरियाच्या मुआनमध्ये भीषण विमान अपघात....१८१ पैकी .१७९ जणांचा मृत्यू