Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
तुझ्या लेकाला कोणती खेळी दाखवण्यास आवडेल असे विचारले असता त्याने पहिल्यांदा मी त्याला मिठी मारेन असे सांगितले. मी अजूनही त्याला ब्लॉक नंबरवर मेसेज करतो, उद्या तो येऊन मला भेटेल अशी माझी अपेक्षा नसल्याचे तो म्हणाला.

Shikhar Dhawan : घटस्फोट झाल्याने लेकाला भेटता येत नसल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत 'दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला' सांगितली आहे. शारीरिकदृष्ट्या अतिशय मजबूत असलेल्या शिखर धवन लेकाच्या आठवणीने चांगलाच हळवा झाला. एक दिवस मुलाला भेटून मिठी मारेन, अशी प्रांजळ भावना त्याने एका पाॅडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केल्या. तुझ्या लेकाला कोणती खेळी दाखवण्यास आवडेल असे विचारले असता त्याने पहिल्यांदा मी त्याला मिठी मारेन असे सांगितले. मी अजूनही त्याला ब्लॉक नंबरवर मेसेज करत आहे. त्यानं उद्या येऊन पाहावं अशी मी आशा सुद्धा करत नाही, परंतु, मी त्याला दाखवेन. तो ते वाचेल किंवा नाही वाचेल, पण मी माझं कर्म आहे ते करत आहे. मी नेहमीच त्याच्यासोबत आहे.
सुनिए शिखर धवन को 🤔pic.twitter.com/rYNe5T7OF3
— Dr. Jyotsana (jyoti) (@DrJyotsana51400) February 16, 2025
मी आधी माझ्या मुलाला मिठी मारीन
शिखर धवनची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याचा मुलगा जोरावरबद्दल बोलताना दिसत आहे. या मुलाखतीदरम्यान शिखर धवनला विचारण्यात आले की, मुलाला भेटताच तुझी कोणती इनिंग तुला दाखवायला आवडेल. यावर उत्तर देताना धवन म्हणाला की, सर्वप्रथम मी मिठी मारून त्याच्यासोबत वेळ घालवणार आहे. मी त्याला काय म्हणायचे ते ऐकून घेईन आणि त्याला कोणती खेळी दाखवावी हे मला कधीच डोक्यात आलं नाही, कदाचित मी त्याच्याबरोबर बसून रडत असेन. हे सांगत असताना धवन रडतानाही दिसला.
मला माझ्या मुलाला बघून दोन वर्षे झाली आहेत
या मुलाखतीदरम्यान धवन म्हणाला की, मला माझ्या मुलाची आठवण येते आणि मी त्याला बघून 2 वर्षे झाली आहेत आणि मी त्याच्याशी एक वर्ष बोललो नाही कारण मला सर्वत्र ब्लॉक केले आहे, परंतु मी त्याच्याशी आध्यात्मिक पद्धतीने बोलतो आणि मला असे वाटते की मी माझ्या मुलाशी दररोज बोलतो, त्याला मिठी मारतो. हे माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि मला त्याची खूप आठवण येते. तो आता 11 वर्षांचा आहे, पण मी त्याच्यासोबत फक्त अडीच वर्षे घालवली आहेत.
तो जिथे असेल तिथे आनंदी राहो
धवन म्हणाला की, मला माझ्या मुलाला परत आणावं लागलं तरी दु:ख काही होत नाही. मी किती आनंद देत आहे हे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला की तो बहुतेक वेळा ऑस्ट्रेलियात राहतो. माझे लग्न झाले तेव्हा माझ्या पत्नीला आधीच दोन मुली होत्या आणि मी त्यांना दत्तकही घेतले होते, पण त्या कधीच भारतात आल्या नाहीत. आता मी माझ्या पत्नीपासून विभक्त झालो आहे, परिस्थिती बदलली आहे. तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत आहात. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा कुठेही असला तरी त्याचे आरोग्य चांगले असावे.
इतर महत्वाच्या बातम्या























