याच दहीचे ताक देखील तितकेच आरोग्यासाठी फायदेशीर आणि महत्त्वाचे आहे.
अनेक घरांमध्ये जेवणाबरोबर ताक हे असतेच.
उन्हाळ्यात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत.
ताकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स जीवाणू असतात. हे जीवाणू आतडे निरोगी ठेवतात आणि हानिकारक जीवाणू बाहेर काढतात.
ताकमध्ये व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सिडंट आणि कॅल्शियमसारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताक प्यायल्याने शरीराला न्यूट्रीशनल मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
ताकामध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने, पाण्याची पातळी योग्य राहते आणि शरीर डिहायड्रेट होण्यापासून बचाव होते.
ताकामध्ये व्हिटॅमिन D असल्याने हाडांचे आरोग्य सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.