ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या पडताळणीचा निर्णय, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माझाला माहिती, अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्यांची गच्छंती अटळ
थकबाकीपोटी सरकारजमा असलेली ४ हजार एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, पुणे, नाशिक आणि कोकणातल्या अल्पभूधारकांसाठी मोठा निर्णय
भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेवर सरकारची कृपादृष्टी, शासकीय वेतन आणि महामंडळाच्या अतिरिक्त निधीसाठी मुंबै बँकेची निवड
सरपंच हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी बीड पोलिसांकडून वॉन्टेड घोषित.. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार.. बीड पोलिसांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर
सीआयडी ऑफिस गाठण्यासाठी वाल्मिक कराडने वापरलेली स्कॉर्पिओ अजित पवारांच्या ताफ्यातली, आमदार धस आणि खासदार सोनवणेंचा आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी उज्वल निकमांना विनंती करणार, सुऱेश धस यांच्या विनंतीचा मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक विचार