Top 100 Headlines : दुपारच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha
आत्मसमर्पणापूर्वी २२ दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे, एबीपी माझाच्या हाती खडा न खडा माहिती, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात दोन गटातील वादाचं पर्यावसान जाळपोळीत, उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी, २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नव्या वर्षात ईडा पिडा टळून सगळं दादाच्या मनासारखं व्हावं, घरातले वादही संपावेत.. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईंचं विठूरायाला साकडं.. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आशाताईंचं विठ्ठल दर्शन
नव्या वर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट, मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंचा इशारा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फोडून काढण्याचं आवाहन
राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको, आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यचेही बदलले सूर.. सरसंघचालकांच्या भूमिकेचं जाहीर समर्थन
सरसंघचालकांच्या मंदिर-मशिद वक्तव्याला विरोध चुकीचा, काळारामाचे पुजारी महंत सुधीरदास याचं भागवतांना समर्थन.. संघच अनेक वर्षांपासून हिंदूरक्षणासाठी आग्रही असल्याचा दावा, प्रयागराजच्या धर्मपरिषदेतही चर्चा अपेक्षित
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर, जिल्ह्याचे पालकमंत्री बनणार का मुख्यमंत्री? दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीकरांमध्ये उत्सुकता