Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
काहींनी अत्यंत भयानक पद्धतीने मीम्स सोशल मीडियात व्हायरल करत कोहलीला डागण्या दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून कोहलीने चिली पनीर खाल्याची चर्चा होती, त्याची सुद्धा खिल्ली उडवत काहींनी मीम्स शेअर केले.

Virat Kohli : देशाच्या राजधानीतील अरुण जेटली स्टेडियम खचाखच भरले होते. एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळल्याचा भास होत होता, पण 2012 नंतर प्रथमच रणजी ट्रॉफी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला चिअर करण्यासाठी ही जनता आली होती. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो त्याच्या चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करू शकला नाही आणि रेल्वेविरुद्धच्या पहिल्या डावात केवळ 6 धावा करून क्लीन बोल्ड झाला.
Virat bhai kya ho gya yaar..😭😭 pic.twitter.com/ZyJpcnEZq7
— Jo Kar (@i_am_gustakh) January 31, 2025
हिमांशू सांगवानने कोहलीला क्लीन बोल्ड केले
रेल्वेचा कमी अनुभवी गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बॉलिंग केल्यावर चाहते अवाक झाले आणि रेल्वेचा गोलंदाज जबरदस्त सेलिब्रेशनमध्ये मग्न झाला. हिमांशू सांगवानच्या अशाच चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारताना विराट कोहलीने दमदार चौकार मारला होता, पण पुढच्याच चेंडूवर हिमांशूने त्याच्या वेगाने त्याला चकवले. विराट कोहलीला फक्त तो शॉट रिपीट करायचा होता.
#ViratKohli innings Highlights 😭 pic.twitter.com/3C7k1aDJEc
— Krundi (@Krundi_in) January 31, 2025
कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर
कोहली बाद झाल्यानंतर चाहत्यांची दोन दिवसांची निराशा झाल्याने काहींनी मैदानात पोस्टर जाळत संतापाला वाट मोकळी करून दिली. काहींनी अत्यंत भयानक पद्धतीने मीम्स सोशल मीडियात व्हायरल करत कोहलीला डागण्या दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून कोहलीने चिली पनीर खाल्याची चर्चा होती, त्याची सुद्धा खिल्ली उडवत काहींनी मीम्स शेअर केले.
#ViratKohli Fans 😭 pic.twitter.com/svf6R8HX17
— Krundi (@Krundi_in) January 31, 2025
हिमांशू सांगवान विराट कोहलीला चकवलं
जर चेंडू बॅटवर आला असता तर तो सीमारेषेबाहेर गेला असता, पण तसे झाले नाही. चेंडू बॅट आणि पॅडमधून गेला आणि ऑफ स्टंपच्या दिशेने गेला. चेंडू लागल्यानंतर विराट कोहलीचा स्टंप हवेत स्विंग होत होता.
Stumps went from Kashmir to Kanyakumari😭#ViratKohli pic.twitter.com/iggftGaWyA
— Charan Royal🐆 (@Charan_JSP_PK) January 31, 2025
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याचे चाहते अवाक झाले होते, मात्र हिमांशू आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. हिमांशूला या विकेटची किंमत माहित आहे. कोहलीने 15 चेंडूंचा सामना केला आणि एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या.
This is so embarrassing for Virat Kohli. champu PR can talk about the lines outside stadiums and how he eats Chilli Paneer. But they won’t solve his technical issues pic.twitter.com/hAE32IHsBs
— Aadit Kapadia (@ask0704) January 31, 2025
विराट कोहली आऊट होताच चाहते स्टेडियममध्ये परतायला लागले
कोहलीला बाद करण्याचे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते आणि आता जेव्हा त्याने जागेवरच चौकार मारला तेव्हा आनंद साजरा करणे स्वाभाविक आहे. विराट कोहली जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत होता तेव्हा त्याचे चाहते स्टेडियमबाहेर जायला तयार होऊ लागले.
Virat Kohli 🤣🤣
— डॉ रमाकान्त राय (@RamaKRoy) January 31, 2025
दिल्ली का दिल तोड़ दिया।
मस्त चिली पनीर खाया,
छक्का बराबर रन बनाया।#ViratKohli𓃵 #ViratRanjiComeback pic.twitter.com/YVmiuiJ86z
सामन्याच्या पहिल्या दिवशी जवळपास 12 हजार प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते, मात्र पहिल्या दिवशी कोहली फलंदाजीसाठी आला नाही. उल्लेखनीय आहे की विराट कोहली 2012 नंतर प्रथमच रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
