Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले...
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू असल्याचं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केलंय.

अकोला : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू असल्याचं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केलंय. आजची पिढी विचार करीत नसून ती आत्मकेंद्रित झाल्याचं विधान आंबेडकरांनी केलंय. ते आज अकोल्यातील सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एका राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते. 'भारतीय संविधान देशाच्या नवीनतम सर्वांगीण विकासाचा पाया' असा या परिसंवादाचा विषय होता. अमेरिकेतील नव्या ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे 23 लाख भारतीयांना देशात परत यावं लागणार असल्याची भीती ही यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीये.
ब्रह्मपुत्रा ही ईशान्येतील 'सेव्हन सिस्टर आणि वन ब्रदर' यांना जोडणारी नदी आहे. मात्र याच नदीवर चीन सात धरणं बांधायची योजना आखत आहे. ही सात धरणं बांधली गेली तर ब्रह्मपुत्रेचं पाणी आपल्याला मिळणार नसल्याचं आंबेडकर म्हणालेय. असं झालं तर ईशान्येतील सात राज्य चीनसोबत जाण्याचा विचार करू शकतात, अशी धक्कादायक भीती आंबेडकरांनी व्यक्त केलीये.
भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा, ही सामाजिक बाब- प्रकाश आंबेडकर
दरम्यान, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी(31 जानेवारी) सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत मत मांडले आहे. भगवान गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा ही सामाजिक बाब असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुरावे पोलिसांनी सार्वजनिक करावेत, असं आंबेडकर म्हणालेय. असं केलं तरच या संदर्भातील लोकांच्या मनातला संभ्रम दूर होणार असल्याचं ही ते यावेळी म्हणालेय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
