मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या जवानांनी सांगितले की, ते रात्री आयपीएल मॅच पाहत होते. सामना संपल्यानंतर सर्वजण झोपी गेले. सकाळी उठलो तेव्हा नीरज कुमार यांचा रक्ताने माखलेला मृतदेह लॉनमध्ये पडला होता.

ASI shoots himself in the head with service revolver : मित्रांसमवेत आयपीएल मॅच पाहून झाल्यानंतर मित्र परत घरी गेले. त्यानंतर गया पोलीस लाईनमध्ये तैनात असलेल्या एएसआय नीरज कुमार ( वय 40) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज (26 मार्च) गुरुवारी सकाळी सहकारी पोलिसांना नीरजचा मृतदेह लॉनमध्ये दिसला. नीरज कुमार मूळचे लखीसराय जिल्ह्यातील सूर्यगढ़ पोलीस स्टेशन हद्दीतील शृंगारपूर गावचा रहिवासी होते. ते गेल्या दीड वर्षांपासून मोफसल पोलिस ठाण्यात तैनात होते. नुकतीच 39 दिवसांची रजा काढून मंगळवारी ते ड्युटीवर रुजू झाले. बुधवारी दिवसभरात नीरज यांनी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन करून ड्युटीवर रुजू होणार असल्याची माहिती दिली होती.
आयपीएल मॅच पाहिल्यानंतर गोळी झाडली
पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या जवानांनी सांगितले की, ते रात्री आयपीएल मॅच पाहत होते. सामना संपल्यानंतर सर्वजण झोपी गेले. सकाळी उठलो तेव्हा नीरज कुमार यांचा रक्ताने माखलेला मृतदेह लॉनमध्ये पडला होता. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. जवळच एक सर्व्हिस रिव्हॉल्वर पडलेली होती. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसएसपी आनंद कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. डीएसपी धर्मेंद्र भारती यांनी सांगितले की, नीरजच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.
पुलिस केंद्र, गया में तैनात पु०स०अ०नि० नीरज कुमार के असामयिक निधन पर गया पुलिस की ओर से विनम्र श्रद्धांजलि। इस दुखद समय में गया पुलिस उनके परिवार के प्रति गहरी संवेदना प्रकट करती है और उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करती है।@bihar_police@IPRDBihar@gaya_dm pic.twitter.com/HObSpxU6CO
— GAYA POLICE (गया (बिहार) पुलिस ) (@GAYAPOLICEBIHAR) March 27, 2025
एएसआय नीरज कुमार तणावात
बिहार पोलिस मेन्स असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष विश्वजीत सिंह यांनी सांगितले की, नीरज कुमार हे विभागीय आणि घरगुती तणावातून जात होते. व्हॉलीबॉलच्या सरावात त्यांच्या हाताला दुखापत झाली, ती गंभीर होत चालली होती. यामुळेही ते मानसिक दडपणाखाली होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
गया पोलीस लाईनमध्ये महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या
दरम्यान, याच ठिकाणी पाच महिन्यांपूर्वी गयाच्या रामपूर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईनमध्ये एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या बॅरेकमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. विभा कुमारी असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्या गया पोलीस केंद्रात तैनात होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
