Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 नं मात
Tokyo Olympics 2020 Live: भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारतानं विजयी आरंभ केला आहे.
Tokyo Olympics 2020 Live: भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारतानं विजयी आरंभ केला आहे. भारतीय संघानं शेवटच्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीतनं भारताकडून दोन गोल केले तर एक गोल रुपिंदरपालसिंगनं केला. आता रविवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत असणार आहे.
तीरंदाजी- क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली दीपिका-प्रवीणची जोडी
ऑलिम्पिकमध्ये तीरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं चीनी ताइपे यांच्या जोडीला 5-3 अशी मात देत तीरंदाजी मिक्स्ड डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.
लावेनिल वालारिवन, अपूर्वी चंडेलाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल नेमबाजीत भारताची इलावेनिल वालारिवन 16 व्या, तर अपूर्वी चंडेला 36व्या स्थानावर राहिली. दोघींचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
पहिलं सुवर्णपदक चीनच्या नावे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेलं आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये चीननं सुवर्णपदक मिळवलं आहे. चीनची यांग कियान हिनं 251.8 स्कोअर करत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. यांग कियाननं हा स्कोर करत ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड देखील केलं आहे.