एक्स्प्लोर

ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली, Dominos कडून लाईफटाईम फ्री पिझ्झाची घोषणा

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले.

Tokyo Olympic : भारतीय महिला वेटलिफ्टर  मीराबाई चानूने (Mirabai Chanu) टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. यासह भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले. सोशल मीडियावरही लोक मीराबाई चानूचे जोरदार अभिनंदन करत आहेत. या मोठ्या विजयानंतर मीराबाई चानूने मुलाखतीत पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची इच्छा ऐकून डॉमिनोजने (Dominos Pizza) तिला लाइफटाईम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.

डॉमिनोने ट्वीट केले आहे, "मीराबाई चानूने म्हटलं आणि आम्ही ते ऐकलं. मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची वाट पाहू नये अशी आमची इच्छा नाही. म्हणूनच आम्ही तिला आजीवन मोफत डॉमिनोज पिझ्झा देत आहोत." कंपनीने तत्परतेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी सोशल मीडियावरील लोक डॉमिनोजचे आभार मानत आहेत. मीराबाईच्या आधी 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरीने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. 21 वर्षांनंतर आता मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकून देशाचे नाव मोठं केलं आहे.

मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, "काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय"

मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिलं. मीराबाई चानूनं पुढे बोलताना म्हटलं की, "सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget