National Sports Day 2021 : 'हे' खेळाडू आहेत या वर्षीच्या 'अर्जुन पुरस्कारा'चे मानकरी
National Sports Day 2021 : या वर्षीच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत (Arjuna Award) टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा अधिक असल्याचं दिसून येतंय.
National Sports Day : भारतीय हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. या निमित्ताने देशात आज राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वश्रेष्ठ खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केलं जातं. 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारानंतर 'अर्जुन पुरस्कार' हा देशातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. तसेच हा पुरस्कार देशातील सर्वात जुना पुरस्कार आहे.
देशात अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली होती. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि 15 लाख रुपये देण्यात येतात.
'खेलरत्न'च्या आधी सुरुवात
'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्काराची सुरुवात 1991 साली करण्यात आली. हा पुरस्कार आधी राजीव गांधींच्या नावाने ओळखला जायचा. या वर्षी त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार ठेवण्यात आलं आहे. त्या आधी अर्जुन पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जायचा.
या वर्षीच्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी
- हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया, नवजोत कौर - हॉकी
- एलावेनिल वलारिवन, अभिषेक वर्मा - नेमबाजी
- सुतीर्था मुखर्जी, अहिका मुखर्जी, मानव ठक्कर - टेबल टेनिस
- उदयन माने, राशिद खान, दीक्षा डागर - गोल्फ
- मुस्कान किरार - तिरंदाजी
- रवि कुमार दहिया, दीपक पुनिया, अंशु मलिक, सरिता मोर - कुस्ती
- अंकिता रैना, प्रजनेश गुणेश्वरन - टेनिस
- सिमरनजीत कौर, गौरव सोळंकी, सोनिया चहल - बॉक्सिंग
- बाला देवी - फुटबॉल
- शिखर धवन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह - क्रिकेट
- एचएस प्रणय, प्रणव जेरी चोपड़ा, समीर वर्मा - बॅडमिंटन
- जेहान दारूवाला - मोटरस्पोर्ट्स
- दुती चंद - ओडिशा स्पोर्ट्स
- विदित संतोष गुजराती, अदिभान भास्करन, एसपी सेथुरमण, एमआर ललिल बाबू, भक्ती कुलकर्णी, पद्मिनी राऊत - बुद्धीबळ (चेस)
- साजन प्रकाश - (स्विमिंग)
संबंधित बातम्या :