Khel Ratna Award Renamed : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; पंतप्रधानांची घोषणा
खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलणार असून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने तो पुरस्कार ओळखला जाणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ""खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल."
भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award!
Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq
काय आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरुप?
देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची सुरुवात तीस वर्षांपूर्वी म्हणजे 1991-92 पासून करण्यात आली. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील चार वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.
बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू ठरला तर 2001 मध्ये नेमबाजपटू आणि ऑलिम्पिकवीर अभिनव बिंद्राला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार पटकावणारा अभिनव बिंद्रा आजवरचा सर्वात तरुण खेळाडू आहे.
एक पदक, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपयांची रक्कम असं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं स्वरुप आहे. 2018 पर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची रक्कम 7.5 लाख रुपये होती.. 2018 पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ करुन ती 25 लाख रुपये करण्यात आलीय.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी
1991-92 विश्वनाथन आनंद (बुद्धीबळ)
1992-93 गीत सेठी बिलियर्ड्स
1993-94 होमी मोतीवाला नौकानयन
1993-94 पी के गर्ग नौकानयन
1994-95 कर्णम मल्लेश्वरी भारोत्तोलन
1995-96 कुंजरानी देवी भारोत्तोलन
1996-97 लिएंडर पेस टेनिस
1997-98 सचिन तेंडुलकर क्रिकेट
1998-99 ज्योतिर्मयी सिकदर अॅथलेटिक्स
1999-2000 धनराज पिल्ले हॉकी
2000-01 पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन
2001 अभिनव बिंद्रा नेमबाजी
2002 के एम बीनामोल अॅथलेटिक्स
2002 अंजली भागवत नेमबाजी
2003 अंजू बॉबी जॉर्ज अॅथलेटिक्स
2004 राज्यवर्धन सिंह राठौड निशानेबाजी
2005 पंकज आडवाणी बिलियर्ड्स आणि स्नूकर
2006 मानवजीत सिंह संधू नेमबाजी
2007 महेंद्र सिंह धोनी क्रिकेट
2008 कुणालाही पुरस्कार नाही
2009 मेरी कोम मुष्टीयुद्ध
2009 विजेंद्र सिंह मुष्टीयुद्ध
2009 सुशील कुमार कुस्ती
2010 सायना नेहवाल बॅडमिंटन
2011 गगन नारंग नेमबाजी
2012 विजय कुमार नेमबाजी
2012 योगेश्वर दत्त कुस्ती
2013 रंजन सोढी नेमबाजी
2014 कुणालाही पुरस्कार नाही
2015 सानिया मिर्झा टेनिस
2016 पीवी सिंधू बॅडमिंटन
2016 दीपा कर्माकर जिमनॅस्टिक
2016 जीतू राय नेमबाजी
2016 साक्षी मलिक कुस्ती
2017 देवेन्द्र झाझरिया पॅरा अॅथलीट
2017 सरदार सिंह हॉकी
2018 मीराबाई चानू भारोत्तोलन
2018 विराट कोहली क्रिकेट
2019 दीपा मलिक पॅराऑलिम्पिक खेळ
2019 बजरंग पुनिया कुस्ती
2020 रोहित शर्मा क्रिकेट
2020 मरियप्पम टी पॅरा अॅथलीट
2020 मनिका बत्रा टेबल टेनिस
2020 विनेश फोगाट कुस्ती
2020 रानी रामपाल हॉकी