एक्स्प्लोर
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत

Marathi on transport vehicle
Source : abp
मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मायबोलीला, मराठी (Marathi) भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली असून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला पाहिजे, त्यासाठी हे विशेष पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्य सरकारनेही राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही मराठी विषय शिकवणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार, सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहीलेले असतात. (उदा . बेटी बचाव बेटी पढाव) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात. मात्र, यापुढे असे सामाजिक संदेश, जाहीरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास (उदा . मुलगी वाचवा..मुलगी शिकवा..!) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. व्यवसायिक वाहन म्हणजे ट्रक, ट्रॅक्टर किंवा व्यवसायाच्या उद्देशाने खरेदी केलेले आणि परिवहन दफ्तरी असलेल्या वाहनांवर आता मराठीतून संदेश लिहिणे बंधनकारक असणार आहे.
मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहीराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरु करावी. तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास गती मिळेल आणि माय मराठीचा आपलेपणा अधिक प्रभावी होईल.
हेही वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
