VBA : वंचितनं अखेर पत्ते उघड केले, महाविकास आघाडीशी फारकत, नागपूरमध्ये वेगळा निर्णय, गडकरींचं टेन्शन वाढणार
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीनं नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात आहेत.
![VBA : वंचितनं अखेर पत्ते उघड केले, महाविकास आघाडीशी फारकत, नागपूरमध्ये वेगळा निर्णय, गडकरींचं टेन्शन वाढणार lok sabha election prakash ambedkar declared support to congress for nagpur lok sabha seat VBA : वंचितनं अखेर पत्ते उघड केले, महाविकास आघाडीशी फारकत, नागपूरमध्ये वेगळा निर्णय, गडकरींचं टेन्शन वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/922ecd39ef5968592c74fb844b587de11711521077048989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय भूमिका स्पष्ट केली. वंचित महाविकास आघाडीसोबत (MVA) आघाडी करणार नसल्याचं आज स्पष्ट झालं आहे.वंचितची काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आहेत. प्रकाश शेंडगे हे ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगलीत लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितनं जाहीर केला आहे. मुस्लिम,जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांजे यांच्यासोबत चर्चा झाली असून ते 30 मार्चपर्यंत भूमिका कळवणार आहेत,असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नागपूरमध्ये वंचितचा काँग्रेसला पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीनं रामटेक लोकसभा मतदारसंघात आज सायंकाळ पर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं. वंचित बहुजन आघाडीनं आतापर्यंत दुसऱ्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली होती. आता नागपूर लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचं यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून म्हटलं होतं. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची होणार नसल्याचं स्पष्ट झाली आहे.
ओबीसी, मुस्लीम आणि जैन उमेदवार देणार
प्रकाश आंबेडकर यांनी या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमची भूमिका ही ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न होते. महाविकास आघाडीसोबत आघाडी करताना ओबीसी उमेदवार, मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत आणि मनोज जरांगे फॅक्टर लक्षात घ्यावं,अशी भूमिका मांडली होती. वंचितनं आज आठ उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचितचे उमेदवार
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूरमध्ये ठाकरेंना दिलासा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नागपूरची जागा काँग्रेसकडे गेली आहे. काँग्रेसनं नागपूरच्या जागेवर आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितनं नागपूरच्या जागेवर विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला. यामुळं नागपूरमध्ये ठाकरे विरुद्ध गडकरी लढतीतत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)