एक्स्प्लोर

Amol Kirtikar Shiv Sena UBT Candidates :  इकडे ईडीची नोटीस, तिकडे लोकसभेचे तिकीट, अमोल किर्तीकर अखेर मैदानात

Amol Kirtikar Shiv Sena UBT Candidates :  ईडी चौकशीच्य फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

Amol Kirtikar Shiv Sena UBT Candidates :   शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ( Shiv Sena UBT Candidate List) केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने  किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

वायव्य मुंबईत किर्तीकर विरुद्ध किर्तीकर?

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. गजानन किर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे या जागेसाठी भाजप आग्रही आहे. शिंदे गटही इतर उमेदवारासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. 

मविआ की महायुती? कोणाचे पारडं जड?

हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य समुदाय आहे. त्यामुळे भाषिक-धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ संमिश्र आहे. मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते. मराठी मते ही प्रामुख्याने शिवसेना, मनसेकडे वळत असल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीमुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे-समाजवादी मते एकत्र येतील. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीमध्ये भाजपवर मोठी जबाबदारी असणार आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तीन आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. 

>> लोकसभा मतदारसंघातील विधानसभेतील आमदार कोणाचे?

>जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर - शिवसेना शिंदे गट
> दिंडोशी - सुनील प्रभू - शिवसेना ठाकरे
> गोरेगाव - विद्या ठाकूर - भाजप
> वर्सोवा - भारती लव्हेकर - भाजप
> अंधेरी पश्चिम - अमित साटम - भाजप
> अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके - शिवसेना ठाकरे 

अमोल किर्तीकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात

कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांची चौकशी सुरू आहे. याआधी देखील किर्तीकर यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किर्तीकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

अटकेची टांगती तलवार?

मुंबई महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिलेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे.  आता याच प्रकरणात ईडी पुन्हा एकदा अमोल किर्तीकर यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता अमोल किर्तीकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget