IPL : पहिल्याच हंगामात पाकिस्तानी खेळाडूंची धमाल, पाहा किती रुपयांना घेतलं होतं विकत
IPL : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली जात नाही. पण आयपीएलच्या पहिल्यावाहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंनी धमाल केली होती.

IPL : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली जात नाही. पण आयपीएलच्या पहिल्यावाहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंनी धमाल केली होती. 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली होती. तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. पण मुंबईमधील ताज हॉटलवर झालेल्या दहशतावादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात धमाल कामगिरी करणाऱ्या पाच पाकिस्तानी खेळाडूबद्दल जाणून घेऊयात...
1. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा भाग होता. अख्तरला कोलकाताने खरेदी केले होते. त्याने तीन सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. कोलकात्याने शोएबला 1.7 कोटी रुपयात खरेदी केले होते.
2. शोएब मलिक आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. सात सामन्यात मलिकने 52 धावा केल्या होत्या. मलिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. 110 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या मलिकला अखेरच्या सामन्यात वगळण्यात आले होते. दिल्लीने मलिकला दोन कोटी रुपयात खरेदी केले होते. मलिकने गोलंदाजीही केली होती. तसेच पाच झेलही घेतले होते.
3. सध्याचे पाकिस्तानचे कोट मिस्बाह-उल-हक 2008 मध्ये आरसीबी संघाकडून खेळले होते. मिस्बाहला आठ सामन्यात 117 धावा करता आल्या. मिस्बाहला 50.20 लाख रुपयांत खरेदी केले होते.
4. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर आयपीएल 2008 मध्ये राजस्थान संघाचा भाग होता. सोहेल तनवीर याने धारधार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. पहिल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा मान सोहल तनवीरकडे आहे. तनवीरने आठ सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या. सोहेल तनवीरला 40.16 लाख रुपयात खरेदी केले होते.
5. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी 2008 मध्ये डेक्कन चार्जस संघाकडून खेळला होता. आफ्रिदीने दहा सामन्यात 81 धावा केल्या होत्या. तसेच नऊ विकेटही घेतल्या होत्या. आफ्रिदीला 2.71 कोटी रुपयांत डेक्कन चार्जसने खरेदी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
