IPL 2022: कोलकात्याच्या संघाला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी, वाचा काय आहे समीकरण?
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 53 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 75 धावांनी पराभूत केलं.
![IPL 2022: कोलकात्याच्या संघाला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी, वाचा काय आहे समीकरण? IPL 2022: Is Kolkata Knights Riders out of playoff race? Know the full equation IPL 2022: कोलकात्याच्या संघाला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी, वाचा काय आहे समीकरण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/744aa7cee21b2af0bd674e45aa31ca4d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 53 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 75 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर कोलकात्याच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा धुसूर झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात कोलकाताच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी कोलकात्यानं चार सामने जिंकले आहेत. तर, सात सामन्यात पराभव स्वीकारला आहे. कोलकात्याला प्लेऑफमध्ये खेळण्याची अजूनही संधी आहे.पण त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
दरम्यान, कोलकात्याचे पुढील सामने मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जॉयंट्स यांच्याशी होणार आहेत. या तिन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. सध्या कोलकात्याच्या आठ गुण आहेत. पुढील तीन्ही सामन्यात विजय मिळवल्यास कोलकात्याचे 14 गुण होतील. जर त्यांचा रन रेट इतर सात सामने जिंकणाऱ्या संघांपेक्षा चांगला असेल तर कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात आरसीबीचा संघ जिंकल्यास आणि पंजाबविरुद्ध सामन्यात गुजरात टायटन्सनं विजय मिळवल्यास आरबीसीबीच्या खात्यात 14 गुण जमा होतील. तर, दिल्लीनं चेन्नई आणि पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आणि राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडू पराभूत झाल्यानंतर दिल्लीच्या खात्यात 14 गुण राहतील.
त्यानंतर पंजाब किंग्जविरुद्ध आरसीबीनं विजय मिळवून दिल्ली आणि हैदराबाद विरुद्ध पराभूत झाल्यास पंजाबच्या खात्यात 12 गुण जमा होतील. दरम्यान, दिल्ली किंवा हैदराबादविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतरही पंजाबचे 14 चं गुण होतील. गुणतालिकेत हैदराबाद आणि दिल्लीचे 12-12 गुण होतील. ज्यामुळं कोलकात्याला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.
चेन्नई सुपर किंग्ज आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना हरला आणि उर्वरित तीन सामने हरले किंवा जिंकले तरी चेन्नईच्या खात्यात जास्तीत जास्त 12 गुण जमा होतील. वरील सर्व समीकरण जुळल्यास तर केकेआरचा संघ लखनौ, गुजरात आणि राजस्थानसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)