एक्स्प्लोर
Raigad: अलिबाग एसटी अपघातानंतर 2 एसट्यांची तोडफोड करत संताप, रहदारीचा मार्गही रोखला, 33 जणांवर गुन्हा दाखल
अलिबागमध्ये एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसस्थानकात दोन बसांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात मोठा गोंधळ होता.
Raigad News
1/7

अलिबाग एसटी अपघातात एसटीची तोडफोड करणाऱ्या संतप्त जमावावर अखेर कारवाई करण्यात आलीय.
2/7

गुरुवारी झालेल्या एसटी आणि दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 18 वर्षाच्या जयदीप बना या तरुणाच्या नातेवाइकांसह संतप्त जमावाने अलिबाग एसटी बस स्थानकात 2 एसटी बसची तोडफोड करून संताप व्यक्त केला .
3/7

या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला, आणि संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली होती.
4/7

अखेर काल रात्री उशिरा या मधील 33 जणांवर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/7

अपघातास जबाबदार असलेल्या एसटी बस चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती आहे..
6/7

संतप्त जमावाने बसस्थानक परिसरात गोंधळ घालून प्रवाशांचे मोठे नुकसान केले, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.
7/7

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
Published at : 01 Mar 2025 08:45 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















